रत्नागिरीतील नळपाणी योजना रखडण्यास भाजप जबाबदार - साळवी

राजेश कळंबटे
सोमवार, 19 मार्च 2018

रत्नागिरी- रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेविषयी दाखल झालेल्या याचिकेवर  आयुक्तांकडून निर्णय झाला नाही तर चार दिवसांनी शिवसेना खासदार, आमदार, नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोंकण आयुक्ताच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करणार आहाेत, अशी माहिती शिवसेना गटनेते बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या दालनात ही पत्रकार परिषद झाली. पाणी योजना रखडण्याला भाजप जबाबदार आहे, असाही आरोप श्री. साळवी यांनी केला. 

रत्नागिरी शहरासाठी 64 कोटींची नळपाणी योजना मंजूर झाली. त्याविरोधात आयुक्ताकडे  याचिका दाखल केली आहे. योजनेच्या कामाला आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. यावर चार महिने झाले तरीही निर्णय झालेला नाही. आयुक्तांवर दबाव असल्यामुळे ते निर्णय देत नाहीत. याचिका दाखल झाल्यावर एक महिन्याच्या आत निर्णय देणे बंधनकारक आहे. सध्या शहरातील पाणी प्रश्न गंभीर झाला असून एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागणार आहे. 

शहरातील पाणी पुरवठा योजना रखडण्यास विरोधी पक्षच जबाबदार आहे. नळपाणी योजना मंजूर होत नाही. पालिकेकडून योजना राबवण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय नियमाला धरून आहेत. येत्या काही दिवसात निर्णय झाला नाही तर मंजूर झालेले पैसे परत जाणार आहेत. त्यासाठी शिवसेना कठोर निर्णय घेत आहे. प्रसंगी जनआंदोलन करणार असल्याचेही साळवी यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Bandya Salvi Press