चिखलगाव - ओणीतील धरणग्रस्तांना मोबदला केव्हा मिळणार ?

रवींद्र साळवी
शनिवार, 20 जानेवारी 2018

लांजा - राजापूर तालुक्यातील चिखलगाव - ओणी येथे लघु पाटबंधारे विभागामार्फत धरण बांधण्यात येत आहे. यामध्ये ओणीमधील जड्यारवाडी येथील शेतकऱ्यांची जमीन धरण प्रकल्पामध्ये गेली आहे. गेली चार वर्षापासून येथील धरणाचे काम सुरु आहे. पण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. 

याअनुषंगाने अजित यशवंतराव यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची दत्ताराम लोलगे यांच्या निवासस्थानी संयुक्त बैठक घेतली. तसेच या प्रश्नी धरणक्षेत्रातील जमीनीची अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली. प्रकल्पगस्त शेतकऱ्यांना बाधित जमीनीचा तातडीने मोबदला मिळावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच गेली अनेक वर्षे प्रलंबीत राहिलेल्या या धरणाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी झाली    

यावेळी लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एस. पी. निकम, शाखा अभियंता रजपुत, जिल्हापरिषद सदस्य आबा आडिवरेकर, पंचायत समिती.सदस्य प्रतिक मटकर, जिल्हा उपाध्यक्ष भरत लाड, ठेकेदार प्रतिनीधी मगदूम, वसंत लोलगे, बाजी लोलगे, दत्ताराम लोलगे, भानू वारिशे, दादू लोलगे, गणपत रहाटे, प्रकाश लोलगे, विजय मटकर, पुनाजी लोलगे, दत्ताराम कुंभार, लक्ष्मण रहाटे, रविकांत मटकर उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri News Chikhalgaon Oni Dam Project issue

टॅग्स