शेतमळ्यांतील सरावाने घडताहेत खेळाडू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

राजापूर - क्रीडाविषयक सोयी-सुविधांची वानवा असतानाही तालुक्‍यातील सोलगावच्या तांबड्या मातीमध्ये दीपक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून प्रणय परवडी आणि तन्वी मल्हार हे ‘अर्जुन’ घडत आहेत. नैसर्गिक गुणवत्तेला जिद्द आणि मेहनतीची जोड देऊन स्पर्धामध्ये मिळविलेले सुयश कौतुकास्पद म्हणावे लागेल. 

क्रीडाशिक्षक श्री. धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणय, तन्वी गेल्या काही वर्षांपासून घडत आहेत. सरावासाठी मैदान वा मॅट नाही. अशा स्थितीतही उपलब्ध साधनसामग्रीच्या साह्याने हे खेळाडू शेतमळ्यांमध्ये सराव करतात. पावसाळ्यात शेती असल्याने सरावामध्ये अडथळे येतात. उंचउडी, थाळीफेक, गोळाफेकसारख्या वैयक्तिक क्रीडाप्रकारामध्ये राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रणय आणि तन्वी यश मिळवित आहेत. 

शिक्षकी पेशातील द्रोणाचार्य पेशाच्या चौकटीबाहेर जाऊन मुलांना घडविणारे शिक्षक म्हणून दीपक धामापूरकर यांची ओळख आहे. प्रणय आणि तन्वीची नैसर्गिक गुणवत्ता ओळखून त्याला पैलू पाडण्याचा ध्यास श्री. धामापूरकर यांनी घेतला. क्रीडाविषयक सुविधा नाहीत याचा बाऊ न करता त्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करत खेळाडू घडवत आहेत. कोणतीही फी न घेता वेळप्रसंगी पदरमोड करून खेळाडू घडविणाऱ्या धामापूरकर यांचे कौतुक होते.

Web Title: Ratnagiri News Deepak Dhamapurkar special story