नावेरीवरील पुलाची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

रवींद्र साळवी
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

लांजा - तालुक्यातील कोंडगे बौध्दवाडी ते कुरंग गावाला जोडणाऱ्या प्रलंबित नावेरी नदीवरील पुलाला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देऊन येत्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने व जेष्ठ कार्यकर्त्या राजश्री (उल्का) विश्वासराव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदन सादर करुन केली आहे.

लांजा - तालुक्यातील कोंडगे बौध्दवाडी ते कुरंग गावाला जोडणाऱ्या प्रलंबित नावेरी नदीवरील पुलाला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देऊन येत्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करावा, या मागणीचे निवेदन भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने व जेष्ठ कार्यकर्त्या राजश्री (उल्का) विश्वासराव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

यावेळी कुरंग परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या पुलाच्या उभारणीने भांबेड परिसरातील अनेक गावे पाचलशी जोडली जाऊन तेथून अणुस्कुरा घाट मार्गे कोल्हापुर जिल्हाशी जोडली जाणार आहेत. परिसरात पर्यटनाला चालना मिळणार आहे. कोंडगे आणि कुरंग परिसरातील ग्रामस्थांकडुन गेली कित्येक वर्षे नावेरी नदीवरती कोंडगे बौध्दवाडी येथे पुल उभारण्याची मागणी केली जात होती.

भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, ज्येष्ठ कार्यकर्त्या राजश्री(उल्का) विश्वासराव यांनी या मागणीची दखल घेऊन शासन दरबारी ते या मागणीच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा करत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याआधीच वारंवार पाठपुरावा केला होता. पाठपुराव्यामुळे पुलाच्या कामाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरीला दिले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये किमान दि़ड कोटी खर्चाचा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यानी सादर केला होता. या पुलाच्या कामाला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देऊन अर्थ संकल्पात प्रस्तावित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदन सादर करुन केली आहे. यावेळी विश्वनाथ पवार, प्रदीप कदम, अशोक तोरस्कर, विश्वनाथ पवार, मिलिंद कदम उपस्थित होते.

या पुलाच्या उभारणीमुळे भांबेड परिसरातील अनेक गावे आणि कोंडगे, रिंगणे, कुरंग व झर्ये ही गावे थेट कारवली मार्गे पाचलशी जोडली जाऊन अणुस्कुरा घाट मार्गे कोल्हापुर जिल्हाशी जोडली जाणार आहेत. 

 

Web Title: Ratnagiri News demand of Naveri Bridge