जात प्रमाणपत्राचा भाजप, राष्ट्रवादीला झटका

संदेश सप्रे
बुधवार, 21 मार्च 2018

देवरूख - जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याचा मोठा फटका भाजपसह राष्ट्रवादीला बसला आहे. दोन्ही पक्षांचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले. त्यांच्यासह अन्य १३ नगरसेवकपदासाठीच्या उमेदवारांचे अर्जही अवैध ठरविण्यात आले आहेत. यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीआधीच शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेस-जनतादल-कुणबी सेना-बविआ आघाडीने सौ. स्मिता संतोष लाड यांना तर भाजपने सौ. मृणाल अभिजित शेट्ये यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. दोन्ही उमेदवारांनी सोमवारी (ता. १९) दुपारी ३ वाजेपर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे होते. मात्र ते त्यांनी उशिरा सादर केले. नियमाप्रमाणे आज त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. 

याप्रमाणे जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केलेल्या प्र. २ मधून  वैष्णवी कांगणे (काँग्रेस) आश्‍विनी पाताडे (भाजप), कल्पना केसरकर (अपक्ष), प्र. ८ मधून स्नेहा संदीप वेल्हाळ (काँग्रेस), प्र. १३ मधून वैभव कदम (भाजप), अमोल कडवईकर (अपक्ष), प्रभाग १६ मधून राजेंद्र गवंडी (भाजप), रामदास निवळकर (अपक्ष),सुरेंद्र पांचाळ (अपक्ष) यांचेही अर्ज अवैध ठरविण्यात आले. 

डमी म्हणून सादर करण्यात आलेले प्रभाग ५ मधील श्रमिका मिहीर आर्ते, प्रभाग ११ मधील सौ. रज्जाक बोदले तर प्रभाग १२ मधील आस्था कोचिरकर यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. निवडणूक लढविण्यास योग्य वय नसल्याचे कारण देत प्रभाग ९ च्या अपक्ष उमेदवार सौ. प्रियंका शेखर जागेळे यांचाही अर्ज अवैध ठरविण्यात आला. 

नगराध्यक्षपदासाठी ३ अर्जच शिल्‍लक
छाननीनंतर नगरसेवकपदाच्या १६ जागांसाठी ५६ अर्ज शिल्लक असून थेट नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या ५ मधील ३ अर्जच शिल्लक राहिले आहेत. १७ पैकी १ जागा आज बिनविरोध झाली तर आणखी एक बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election