स्मार्ट बोर्डद्वारे शंभर रुपयांत डिजिटल शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

रत्नागिरी - आधुनिक तंत्राचा वापर करून अनेक शिक्षक तंत्रस्नेही बनले. त्यामुळे ८० हजार रुपयांच्या स्मार्ट बोर्डच्या तुलनेत फक्त १०० रुपयांच्या खर्चात डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा आगळावेगळा प्रयोग शिक्षणाच्या वारीत एका शिक्षकाने सादर केला.

रत्नागिरी - आधुनिक तंत्राचा वापर करून अनेक शिक्षक तंत्रस्नेही बनले. त्यामुळे ८० हजार रुपयांच्या स्मार्ट बोर्डच्या तुलनेत फक्त १०० रुपयांच्या खर्चात डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा आगळावेगळा प्रयोग शिक्षणाच्या वारीत एका शिक्षकाने सादर केला. अशाप्रकारे ५५ स्टॉलमध्ये तंत्रस्नेही शिक्षकांचे वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी चार दिवसांमध्ये दहा हजारपेक्षा जास्त शिक्षकांनी भेटी दिल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

या वारीचा शनिवारी सायंकाळी समारोप झाला. शेवटच्या दिवशी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी भेटी देऊन शिक्षकांनी केलेल्या प्रयोगांची माहिती घेतली. अहमदनगर-नेवासे भालगाव प्राथमिक शाळेचे विज्ञानप्रेमी शिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या डिजिटल ग्लास बोर्ड दिली. पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी भेट दिली. श्री. शिंदे यांनी पालकांच्या वर्गणीतून ३२ इंची एलईडी टीव्ही, होम थिएटर व वायरलेस की बोर्डाचा उपयोग करीत आपल्या वर्गासाठी डिजिटल ग्लास बोर्ड तयार केला आहे. त्याचा उपयोग करून वर्गातील छोटी मुलांना कृतिशील शिक्षण देत आहेत. या पारदर्शक काचेचा उपयोग करून मुळाक्षरे गिरवता येतात. त्यातील घड्याळाचा उपयोग कृतीयुक्तसाठी केला जातो. त्यासाठी ७२० प्रकारच्या इमेज तयार केल्या आहेत. यू ट्यूब वापर करून अध्ययन करता येते. हा ८० हजारच्या स्मार्ट बोर्डच्या तुलनेत फक्त १०० रुपयांच्या खर्चात तयार होते. यासाठी लागणारा सर्व डाटा विनामूल्य देणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

पालघर-डहाणू येथील के. एल. पोंदा हायस्कूलचे शिक्षक बी. आर. चव्हाण यांनी १७० शब्दांपासून ५० लाख इंग्रजी वाक्‍ये तयार करण्याचा उपक्रम स्टॉलमध्ये मांडला होता. या उपक्रमाची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. या उपक्रम जागतिक व राष्ट्रीय विक्रम आल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. या स्टॉलला पंचायत समिती सदस्य सौ. साक्षी रावणंग यांनीही भेट देत अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया समजून घेतली. यावेळी डायट प्राचार्य डॉ. शेख, गटविकास अधिकारी सुनील पाटील, चंद्रकांत कोकरे, काशिनाथ घाणेकर, तुकाराम कुवळेकर आदी उपस्थित होते.

सुटसुटीत नियोजन
शिक्षणाची वारी यशस्वी करण्यासाठी विविध कमिटीज्‌ स्थापन करण्यात आल्या होत्या. या वारीला सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग येथील तंत्रस्नेही शिक्षक आले होते. त्यांची निवासासह भोजन व्यवस्था उत्तम असल्याचा निर्वाळा उपस्थित शिक्षकांनी दिला. राज्यभरात झालेल्या वारीपेक्षा रत्नागिरीत चांगले नियोजन झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Digital education in 100 rs