सोशल मीडियाद्वारे २०० फराळ बॉक्‍स गोरगरिबांसाठी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - आपल्यासोबत गोरगरिबांची दिवाळी देखील शुभ करा अशा आशयाच्या रत्नागिरी खबरदार व्हॉट्‌स अॅप ग्रुपने दिलेल्या दीपावली संदेशाला भरभरून प्रतिसाद मिळाला. ग्रुपमधील सदस्यांनी तब्बल २०० बॉक्‍स फराळ गोळा केले आणि ते गोरगरिबांना वाटून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

रत्नागिरी - आपल्यासोबत गोरगरिबांची दिवाळी देखील शुभ करा अशा आशयाच्या रत्नागिरी खबरदार व्हॉट्‌स अॅप ग्रुपने दिलेल्या दीपावली संदेशाला भरभरून प्रतिसाद मिळाला. ग्रुपमधील सदस्यांनी तब्बल २०० बॉक्‍स फराळ गोळा केले आणि ते गोरगरिबांना वाटून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

सोशल नेटवर्कचा सुयोग्य आणि समाजहितासाठी वापर कसा करावा याचा आदर्श रत्नागिरी खबरदारमधील सभासदांनी समाजासमोर ठेवला. दीपावलीच्या शुभसंदेशाला भरभरून प्रतिसाद मिळाला. फराळ वाटपाचे काम तीन दिवस सुरू होते. झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक गरीब घरांपर्यंत हा फराळ पोहोचवण्यात आला आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यासोबत एचआयव्हीबाधित मुलींना सांभाळणारी आशीर्वाद संस्था, मतीमंद मुलांची आशादीप संस्था, माहेर संस्था, क्रांतीनगर, आठवडा बाजार, मुरुगवाडा, किल्ला आदी भागातील झोपडपट्टीत घराघरात जाऊन फराळाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राहुल पंडित, किरण सामंत, मुन्ना देसाई, हेमंत वणजू, बाबू खातू, उमेश मलुष्टे, कुणाल शेरे, गौतम बाष्टे, प्रसन्न पेठे, अमोल डोंगरे, सौरभ मलुष्टे, गणेश धुरी, रवींद्र वणजु, अभिजित गोडबोले, अन्नपूर्णा स्नॅक्‍स, वीरेंद्र वणजू, दीपक पवार, निखील देसाई, म्हाप परिवार, विलास संसारे, निमेश नायर, बिपीन बंदरकर, संजय साळवी, ब्रिजेश साळवी, सचिन शेट्ये या  सदस्यांनी सहभाग नोंदवला.

अनेकांना मदत
व्हॉट्‌सअप ग्रुपमधील ज्येष्ठ सभासदांच्या पुढाकारामुळे सर्व सभासद मदतीला नेहमीच तत्पर असतात. यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार (कै.) द. मु. सावंत यांच्या कुटुंबाला ८५ हजार रुपयांची मदत, कुष्ठरोग वसाहतीला ४० हजाराची मदत तर लहान मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी १ लाखाची मदत एका दिवसात गोळा करून खबरदारने समाजाप्रती आपली कर्तव्यभावना आपल्या कार्यातून सिद्ध केली आहे.

Web Title: ratnagiri news dipawali sweets for poor peoples

टॅग्स