ज्ञानदा पोळेकर मृत्यूप्रकरणी तीन डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

रत्नागिरी - ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणाला खऱ्या अर्थाने कायद्याचा आधार मिळाला. ज्ञानदा पोळेकर यांच्यावर पावसकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अक्षम्य दुर्लक्ष करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. दीपा पावसकर, डॉ. संजीव पावसकर, डॉ. गिरीश करमरकर (सर्व रा. रत्नागिरी) या तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

रत्नागिरी - ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणाला खऱ्या अर्थाने कायद्याचा आधार मिळाला. ज्ञानदा पोळेकर यांच्यावर पावसकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अक्षम्य दुर्लक्ष करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. दीपा पावसकर, डॉ. संजीव पावसकर, डॉ. गिरीश करमरकर (सर्व रा. रत्नागिरी) या तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

झी चोवीस तासचे पत्रकार आणि ज्ञानदा पोळेकर यांचे पती प्रणव प्रमोद पोळेकर यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. दोघा संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. प्रणव पोळेकर यांच्या पत्नी ज्ञानदा पोळेकर (वय २६) यांना डॉ. संजीव पावसकर आणि डॉ. दीपा पावसर या स्त्रीरोगतज्ञ डॉक्‍टरांनी व्यक्तिशः तपासणी न करता त्यांच्या अनुपस्थितीत ज्ञानदाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.

ज्ञानदाला होणाऱ्या त्रासाचे कोणतेही योग्य निदान न करता परिणामकारक उपाचाराअभावी ज्ञानदा पोळेकर हिचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असूनही डॉक्‍टरांच्या अनुपस्थितीत हॉस्पिटलच्या स्टाफमार्फत (परिचारिका) फोनवरून संपर्क करून उपचार सुरू ठेवले. डॉ. गिरीश करमरकर हे स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी १० तारखेला रात्री सव्वादहा वाजता ज्ञानदाची तपासणी केली. 

तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिच्यावर स्वतः उपस्थित राहून वैद्यकीय निगराणी ठेवणे आवश्‍यक होते. तरी ते तत्काळ हॉस्पिटलमधून निघून गेले. त्यामुळे प्रणव पोळेकर यांची पत्नी ज्ञानदा हिच्या उपचाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले, म्हणून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला, अशी माहिती शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी दिली. 
ज्ञानदा पोळेकर हिचा १२ मार्च २०१८ ला सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

ज्ञानदा पोळेकर यांचे वडील प्रभाकर राजाराम सप्रे (रा. शेरेनाका) यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून दाखल करण्यात आला होता. तीन डॉक्‍टर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर आज दुपारी शहर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू केली.

Web Title: Ratnagiri News Dnynada Polekar Death issue