पक्षांच्या आवाजावर युवकांनी संशोधन करावे - डाॅ. मेनन

मकरंद पटवर्धन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - जगभरातले 60 टक्के पक्षी गाणे म्हणतात. मात्र त्यासाठी त्यांना बरेच शिकावे लागते आणि स्वतःची शैली तयार करावी लागते. मादीला आकृष्ट करण्यासाठी दैनंदिन जीवनात संवादासाठी ते गायन करतात. युरोप, अमेरिकेत यावर बराच अभ्यास सुरू आहे. रत्नागिरीतील युवकांनी पक्ष्यांच्या आवाजावर संशोधन करावे. असे संशोधन फार कठीण नाही, असे प्रतिपादन डॉ. शशिकांत मेनन यांनी केले.

रत्नागिरी - जगभरातले 60 टक्के पक्षी गाणे म्हणतात. मात्र त्यासाठी त्यांना बरेच शिकावे लागते आणि स्वतःची शैली तयार करावी लागते. मादीला आकृष्ट करण्यासाठी दैनंदिन जीवनात संवादासाठी ते गायन करतात. युरोप, अमेरिकेत यावर बराच अभ्यास सुरू आहे. रत्नागिरीतील युवकांनी पक्ष्यांच्या आवाजावर संशोधन करावे. असे संशोधन फार कठीण नाही, असे प्रतिपादन डॉ. शशिकांत मेनन यांनी केले.

(कै.) अरुअप्पा जोशी स्मृतिदिन माजी प्राचार्य (कै.) डॉ. वि. के. बावडेकर विज्ञान व्याख्यानमालेत ते बोलत होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात डॉ. मेनन यांचे व्याख्यान झाले. ते डीटीएम प्रयोगशाळेचे सहायक संचालक असून त्यांनी पक्ष्यांची गाणी यावर बहुमोल विचार मांडले. पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, त्यांची गाणी ऐकवून रंजक पद्धतीने व्याख्यान दिले.

डॉ. मेनन म्हणाले की, भारतात पक्ष्यांच्या गाण्यांवर फारसे संशोधन झाले नाही. अमेरिकेत अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लावर व पुढे दोन-तीन वर्षे त्या पक्ष्यांच्या गाण्यांत होणारा बदल याचे संशोधन झाले आहे. आपणही मोबाईलवर आवाज ध्वनिमुद्रित करून त्याचा सोनोग्राम काढू शकतो. प्रत्येक पक्षाचा आवाज व त्याची शैली भिन्न असते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर पहिल्या 15 दिवसांत ते पुढे काही दिवसांपर्यंत त्याच्या आई-वडिलांच्या आवाजातून पिल्ले आवाज लक्षात ठेवून शिकत असतात. या पक्ष्यांना दुसऱ्याच पक्षाचा आवाज ऐकवला तरी परिणाम होत नाही. व्हाईट स्पॅरोला स्ट्रॉबेरी फिंच पक्षाचा ध्वनिमुद्रित आवाज ऐकवला. मात्र या पक्षांना आई-वडिलांकडूनच थेट समोर आवाज ऐकून शिकण्याची सवय असते. मादी आपल्या वडिलांचा आवाज लक्षात ठेवते, तसा आवाज असलेल्या नर पक्षाशी मीलन करत नाही. संशोधनासाठी सूक्ष्म निरीक्षणाची गरज आहे.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक पक्षाच्या आवाजाचा पॅटर्न, फ्रिक्वेन्सी यात भरपूर फरक आढळतो. एकाच प्रकारच्या पक्षांमध्ये जंगली भाग व वर्दळीमुळे फिक्वेन्सीमध्ये भरपूर फरक पडतो. असा प्रयोग स्पेन, इराण, मोरोक्को, इंग्लंड, नार्वे, स्वीडन या देशांमध्ये करण्यात आला होता. कलिना कॅंपस, व्हिटी, बांद्रा या ठिकाणी पक्ष्यांच्या आवाची फ्रिक्वेन्सी वाढल्याचे संशोधनावरून लक्षात आले आहे. काही पक्षी एका वर्षात एक गाणं तयार करतात. तर काही पक्षी सलग तीन वर्षे एक गीत विकसित करतात. वयानुसार त्यात नावीन्यता येत असते.

Web Title: Ratnagiri News Dr Shashikant Menon speech