तटरक्षक दलाच्या अभियंत्याची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

रत्नागिरी - एका खासगी कंपनीच्या नावाने हरियानामध्ये टॉवर उभारण्याचे ऑनलाइन ऍग्रीमेंट करत एकाने तटरक्षक दलाच्या अभियंत्याची 83 हजारांची फसवणूक केली. 

रत्नागिरी - एका खासगी कंपनीच्या नावाने हरियानामध्ये टॉवर उभारण्याचे ऑनलाइन ऍग्रीमेंट करत एकाने तटरक्षक दलाच्या अभियंत्याची 83 हजारांची फसवणूक केली. 

निर्मलसिंह बलजित सिंह (रा. सध्या कपाले हॉस्पिटल, थिबा पॅलेस, मूळ हरियाना) असे या अभियंत्याचे नाव आहे. सध्या ते रत्नागिरी तटरक्षक दलामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी एका संकेतस्थळावर भारतात कुठेही रिलायन्स कंपनीला टॉवर उभारण्यासाठी 500 चौरस फुटाची जागा आवश्‍यक असल्याची जाहिरात बघितली. त्या अनुषंगाने निर्मलसिंह यांनी पत्नी सुमन यांच्या नावे असलेल्या हरियानातील जमिनीबाबत ऑनलाइन अर्ज केला. त्यासाठी दरमहा 15 हजार रुपये भाडे, याप्रमाणे 15 वर्षांसाठीचे 15 लाख रुपये ऍडव्हान्स मिळावेत, अशी मागणी केली. कंपनीने ऍडव्हान्स देण्याची तयारी दर्शविली. त्यांनी 29 मे रोजी जेव्हा कंपनीचे संकेतस्थळ पाहिले तेव्हा "टॉवर रजिस्ट्रेशन प्रोसेसर' फी म्हणून 14, 313 रुपये आयसीआयसीआय बॅंकेत भरण्यास सांगितले होते. त्यानुसार निर्मलसिंह यांनी आयसीआयसीच्या शाखेत 14, 313 रुपये भरले. त्यानंतर आठ जूनला संजयकुमार सिंह यांच्या नावाने त्यांना मोबाईल (7970994661) आला व त्यांनी टॉवरसंदर्भातील तुमचे ऍग्रीमेंट तयार झाले आहे. "टॉवर रजिस्ट्रेशन फी' म्हणून 68 हजार रुपये भरा, असे सांगितले. त्यानंतर पैसे जमा झाल्याचे पत्र आले. निर्मलसिंह यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी संकेतस्थळावर जाऊन शोध घेतला असता तेव्हा कंपनी बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Web Title: ratnagiri news Engineering fraud case crime