धूर बंद करण्यासाठी ‘युरो 6 व्हर्जन’च्या गाड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

रत्नागिरी - राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात युरो ४ या व्हर्जनच्या गाड्या आहेत. त्या बदलून २०२० पासून युरो ६ व्हर्जनच्या गाड्या दाखल होणार आहेत. यामुळे रस्त्यावरील धूर कमी होण्याची शक्‍यता आहे.

रत्नागिरी - राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात युरो ४ या व्हर्जनच्या गाड्या आहेत. त्या बदलून २०२० पासून युरो ६ व्हर्जनच्या गाड्या दाखल होणार आहेत. यामुळे रस्त्यावरील धूर कमी होण्याची शक्‍यता आहे.

रत्नागिरी एसटी विभागात युरो ४ व्हर्जनच्या ८५२ गाड्या आहेत. काही गाड्या धूर ओकतात. त्यामुळे हा धूर बंद करण्याकरिता महामंडळाने एप्रिल २०२० पासून युरो ६ व्हर्जनच्या गाड्या आणण्याचा निर्धार केला आहे. एसटी महामंडळाकडे १० वर्षे व १२ लाख किलोमीटर धावलेल्या गाड्या आहेत. रत्नागिरी विभागात ५० हजार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या १६३ गाड्या असून त्यांचे प्रदूषण खूप कमी आहे. साडेपाच लाख ते १० लाख किमी धावलेल्या ५२०, तर दहा लाखपेक्षा अधिक किलोमीटर धावलेल्या ६९ गाड्या आहेत. यातील काही गाड्या धूर सोडणाऱ्या आहेत.

एसटीच्या धुरात कार्बन मोनोक्‍साईड आणि कार्बन डायऑक्‍साईड असतो. हे दोन्ही वायू शरीरासाठी हानिकारक आहेत. श्वसन, त्वचेला त्रास होतो. २०२० नंतर एसटीच्या गाड्या कमी धूर सोडणाऱ्या असतील व त्यामुळे रस्त्यावरील अन्य वाहनचालकांसमवेत पादचाऱ्यांनाही त्रास होणार नाही.

प्रदूषण कमी करण्यासाठी एप्रिल २०१७ पासून भारतात युरो ४ व्हर्जनची वाहनांचा वापर सुरू झाला. प्रदूषण रोखण्यासाठी युरो ६ हे व्हर्जन आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. एप्रिल २०२० पासून या व्हर्जनची वाहने भारतातील रस्त्यांवरून धावणार आहेत.
- विजय दिवटे,
यंत्रचालन अभियंता

Web Title: Ratnagiri News Euro 6 versions Vehicles