चिपळूण तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

मुझफ्फर खान
सोमवार, 11 जून 2018

चिपळूण - कापरे येथे वीजेचा शॉक लागून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. येथे दोन दिवस माॅन्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. महावितरणच्या तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन पहिल्याच पावसात अनंत रत्नू कदम (वय. 62) यांचा मृत्यु झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कदम हे आज सकाळी साडेसात वाजता शेतात नांगरण्यासाठी गेले होते. दोन शेत नागरल्यानंतर ते तिसर्‍या शेतात नागर घेवून गेले. कदम यांच्या शेतालगत झाड आहे. झाडाची फांदी तुटून महावितरणच्या विद्युत वाहिनीवर पडली. त्यामुळे विद्युत वाहिनी तुटून ती शेतात पडली होती. या विज वाहिनीचा पुरवठा सुरू होता. तुटलेल्या विद्युत तारेशी त्यांचा स्पर्श झाला आणि  त्यांचे जाग्यावरच निधन झाले.

घटना घडली तेव्हा कदम यांच्यासोबत कोणी नव्हते. सकाळी 11 वाजता त्यांचे नातेवाईक भाकरी घेवून शेतावर गेल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर गावच्या पोलिस पाटीलांनी याबाबतची माहिती पोलिस ठाणे, महसूल विभाग, महावितरण कार्यालयाला दिली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. पालशेतकर घटनास्थळी गेले. त्यांनी महावितरणकडून तातडीची मदत म्हणून कदम यांच्या नातेवाईकांना 20 हजाराचा धनादेश दिला.

Web Title: Ratnagiri News farmer dead due to electric shock