आंबेत घाटात लागलेली आग प्रवाशांच्या प्रयत्नांने आटोक्यात

प्रमोद हर्डीकर
गुरुवार, 15 मार्च 2018

साडवली - गोरेगाव ते मंडणगड या मार्गावरील आंबेत घाटात  काल सायंकाळी जंगलात वणवा लागला होता. या मार्गावरुन प्रवास करणारे निवेदिता प्रतिष्ठान दापोलीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे व सदस्य महेश वरवडेकर यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी झाडपाल्याने झोडपून या आगीवर नियंत्रण मिळवले. या दोघांनी सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. 

निसर्ग संपदा आपणच वाचवली पाहीजे. या उद्देशाने आम्ही पुढाकार घेत या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यात आम्हाला यश आले. आगीच्या भक्ष्यस्थानी जंगल पडू नये यासाठी आम्ही हे कार्य केले. 

- प्रशांत परांजपे, निवेदिता प्रतिष्ठान, दापोली

Web Title: Ratnagiri News fire in Ambet Ghat