देवरुख परीसरात धुकेच धुके

प्रमोद हर्डीकर
रविवार, 4 मार्च 2018

साडवली - शिमगोत्सवात पेटलेल्या होळीने अधिक उष्णता जाणवत असतानाच पहाटे पहाटे थंडीही जाणवत आहे. आज (रविवारी) सकाळी दाट धुकेही पडले होते. देवरुख शहर परिसरात दवाचा थरही नागरीकांनी अनुभवला. 

साडवली - शिमगोत्सवात पेटलेल्या होळीने अधिक उष्णता जाणवत असतानाच पहाटे पहाटे थंडीही जाणवत आहे. आज (रविवारी) सकाळी दाट धुकेही पडले होते. देवरुख शहर परिसरात दवाचा थरही नागरीकांनी अनुभवला. 

देवरुख परीसरात गावागावात शिमगोत्सवाची धुम सुरु आहे. कोकणातील या उत्साही सणासाठी गावागावात चाकरमानीही दाखल झाले आहेत. सानेवर होळ्या पेटत आहेत. मार्चमध्ये उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत .असे असतानाच गेले चार पाच दिवस रात्री थंडीही जाणवत आहे. तर पहाटे सर्वत्र धुकेच धुके पडलेले पहायला मिळत आहे. या विचित्र वातावणाचा अनुभव नागरीक घेत आहेत. पहाटे पडणारे धुके व धुक्यात हरवलेले आपले गाव पहाताना मात्र होळीसाठी आलेला चाकरमानी स्वप्नात हरवून जात आहे.

शहरात आपण दाटीवाटीने सिमेंटच्या जंगलात रहातो, तिथे मोकळी हवा मिळत नाही. गावाकडे मात्र सारवलेल्या जमिनी, हिरवीगार झाडे, शुद्ध हवा यामुळे मन प्रसन्न होते व गावातून शहरात जायचे मन होत नाही. धुक्यात हरवलेले आपले कौलारु घर पाहताना कोकणची श्रीमंतीची जाणीव होते 

- प्रसाद जोशी

Web Title: Ratnagiri News fog in Devrukh region