प्लास्टिक द्या, कागदी पिशव्या घ्या!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

रत्नागिरी - ‘रत्नागिरी : दि गिफ्ट ट्री’ आणि पुणे येथील हरित मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या’ या उपक्रमाचा प्रारंभ रविवारी (ता. १४) केला जाणार आहे.

रत्नागिरी - ‘रत्नागिरी : दि गिफ्ट ट्री’ आणि पुणे येथील हरित मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या’ या उपक्रमाचा प्रारंभ रविवारी (ता. १४) केला जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे होणाऱ्या कार्यक्रमाला कर्जत (जि. रायगड) पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थित राहणार आहेत. 

प्लास्टिकमुक्त व स्वच्छ रत्नागिरीसाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. परिसराच्या स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे. पालिकेच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत ‘दि गिफ्ट ट्री’ संस्थेचे सिद्धेश धुळप यांच्या पुढाकाराने ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला उद्योजक किरण सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी, सामाजिक वनीकरण विभागाचे श्री. धुमाळ, हरित मित्र परिवाराचे महेंद्र घागरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमस्थळी येताना नागरिकांनी आपल्याकडील प्लास्टिक पिशव्या आणाव्यात. नागरिकांना तेथेच कापडी पिशव्या दिल्या जातील. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दि गिफ्ट ट्री आणि हरित मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: ratnagiri news Give Plastic, take Paper bags