#IdealSchool सलग पाच वर्षे पट वाढवणारी शाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

गुहागर - जिल्हा परिषदेची गुहागरमधील जीवन शिक्षण शाळा क्र. १ ही सलग पाच वर्षे पट वाढणारी शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. यंदा ३९ विद्यार्थ्यांनी पहिलीसाठी प्रवेश घेतला. त्यांचे औक्षण करून, खाऊ देऊन  स्वागत करण्यात आले. 

गुहागर - जिल्हा परिषदेची गुहागरमधील जीवन शिक्षण शाळा क्र. १ ही सलग पाच वर्षे पट वाढणारी शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. यंदा ३९ विद्यार्थ्यांनी पहिलीसाठी प्रवेश घेतला. त्यांचे औक्षण करून, खाऊ देऊन  स्वागत करण्यात आले. 

तालुक्‍यात नव्हे तर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस घटते, असा आरोप होतो. तो या शाळेने खोडून काढला आहे.

वर्षांपूर्वी शाळेची पटसंख्या वाढावी म्हणून आम्ही घरोघरी फिरून मुलांना शाळेत घाला, असा आग्रह करत होतो. मात्र, शाळेचा गुणात्मक, भौतिक विकास सुरू झाल्यावर आता पालक प्रवेशासाठी आमच्याकडे विचारणा करतात.
- चंद्रकांत झडगे,
शिक्षक

याबाबत मुख्याध्यापक केशव क्षीरसागर म्हणाले, पहिली ते सातवीपर्यंत सेमी इंग्रजी, शासनाच्या निकषांनुसार शाळेतील सर्व मुले प्रगत असणे, शिष्यवृत्ती परीक्षेतील सातत्यपूर्ण यश, गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक गरजांची पूर्तता, लोकसहभाग, परिसर सुशोभीकरण आदी मुद्दे, यासाठी कारणीभूत आहेत.

वाढती पटसंख्या 
शैक्षणिक वर्ष    पट
२०१४-१५    १७०
२०१५-१६    १७१
२०१६-१७    १७९
२०१७-१८    १८६
२०१९-१९    २०० 
 (अंदाजे)

खासगी शाळांशी स्पर्धा असल्याने त्याप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न सातत्याने शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती करत आहे. यावर्षी सहावी व सातवीच्या मुलांना फुलपॅन्ट, टाय, बूट, तर मुलींसाठी पंजाबी व बूट असा गणवेश केला. शाळेतील सर्व मुलांना एकाच प्रकारच्या व रंगाच्या स्कूलबॅग दिल्या. जीवन शिक्षण शाळा क्र. १ मधील शिक्षकांनी प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

उपनगराध्यक्षा स्नेहा भागडे यांच्यासह नगरसेवकांनी वही, पेन्सिल आणि गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. विनोद रहाटे यांनी विद्यार्थ्यांना पेन्सिल, खोडरबर आणि खाऊ दिला. 

Web Title: Ratnagiri News Good performing school special