विरसईत ५९ वर्षे निवडणूक बिनविरोध

विरसईत ५९ वर्षे निवडणूक बिनविरोध

दाभोळ -  दापोली तालुक्‍यातील आदर्श गाव विरसईने ग्रामपंचायत स्थापनेपासून जोपासलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा या निवडणुकीतही राखली. या वेळी सरपंच म्हणून सुरेश वडतकर यांची निवड केली आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या विरसई गावच्या ग्रामपंचायतीमध्ये एकदाही निवडणुकीसाठी मतदान झालेले नाही.  ५९ वर्षे गावातील मंडळींनी एकत्र बसून सामंजस्याने जाहीर झालेल्या निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. 

शाश्‍वत ग्रामविकास हाच विकासाचा धागा पकडून आदर्श गाव विरसईच्या ‘विरसई जनसेवा मंडळा’ने गावाच्या विकासासाठी मोठे कार्य केले आहे. निवडणुकीपूर्वी पाच वर्षे गावच्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या ग्रामस्थांची मंडळातर्फे निवड करून गाव बैठकीत त्यांची नावे घोषित करण्यात येतात. त्यावर लोकमताचा आदर करुन हरकती घेतल्या जातात व त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांची नावे जाहीर केली जातात.
यावर्षीची सरपंच निवड थेट मतदारांमधून होत असतानाही सुरेश भिकू वडतकर यांची सरपंचपदी, माजी सरपंच करिष्मा राणे, मनोरमा राणे, सुनीता जाधव, विद्‌या शिगवण, सहदेव जाधव, रूपेश तांबीटकर, भगवान जाधव या सात जणांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

ही निवडणूक  परंपरेप्रमाणे बिनविरोध होण्यासाठी जनसेवा मंडळाचे अध्यक्ष अनंत राणे, सचिव पांडुरंग भुवड, सहसचिव सुरेश बेटकर, समन्वयक विठ्‌ठल माने, लक्ष्मण गोरिवले, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष दिलीप राणे, अनिल पिंपळकर, कृष्णा राणे, सुनिल पिंपळकर, मयुर मांडवकर, शालिनी राणे, निशा तांबीटकर, अस्मिता बेटकर, सुनील राणे, महादेव तांबीटकर, दशरथ जोशी यांनी प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com