रत्नागिरीत गतवर्षीच्या तुलनेत भूजल पातळी घटली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी -  गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात सातशे मिलीमीटर कमी पाऊस झाला. त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर अखेरीस झालेल्या भूजल विभागाच्या सर्व्हेक्षणात खेड तालुक्‍यात पाणीपातळीत ०.०६ मीटर घटली आहे. उर्वरित तालुक्‍यांमध्ये गतवर्षीच्या पाणी पातळीची आकडेवारीही कमी झाल्याचे दिसते. यावरुन उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात सरासरी पाऊस ३,५१५ मिमी पडला आहे. गतवर्षीच याच कालावधीत ४,१८५ मिमीची नोंद झाली होती. राजापूर, चिपळुणात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला; मात्र उर्वरित सात तालुक्‍यात पावसाची आकडेवारी घटली आहे. भूगर्भ विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील ६२ विहिरींची पाणीपातळी तपासण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात विश्रांती घेत पाऊस पडला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात चांगली नोंद झाली.

परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला. त्यामुळे सरासरी पाणीपातळी गाठली गेली. नऊपैकी खेड तालुक्‍यात ०.०६ मीटरने पातळी घटली आहे. हा तालुका सर्वाधिक टंचाईग्रस्त गावांचा आहे. या तालुक्‍यात चार महिन्यामध्ये ३२२१ मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी तेथे ५०८३ मिमीची नोंद झाली होती. त्याचा परिणाम पाणीपातळीवर झाला आहे.

दरवर्षी मार्च महिन्यात खेड तालुक्‍यात पहिला टॅंकर धावतो. यावर्षी मार्चच्या आधीच टॅंकर धावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. उर्वरित आठ तालुक्‍यातील सरासरी पातळीत वाढ दर्शविते; परंतु गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना केली तर त्यात तफावत आढळते. गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे टंचाईची झळ कमी प्रमाणात बसली होती. धनगरवाड्यांसह कातळावरील लोकवस्तींना पाण्याचा प्रश्‍न जाणवला. उर्वरित भागांमध्ये त्याची तेवढी झळ बसलेली नव्हती; मात्र यावर्षी टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे.

लिकेजमुळे खेडात जल‘मुक्‍त’
खेड तालुक्‍यातील जलयुक्‍त शिवारमधील काही बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठाच झालेला नाही. बंधाऱ्यांना लिकेज असल्यामुळे साठलेले पाणी वाहून गेले आहे. त्या बंधाऱ्यातून सिंचनाला वा नियमित वापराला पाणी मिळणे दुरापास्त आहे. याबाबत खेडचे युवासेना नेते योगेश कदम यांनीही तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.

Web Title: Ratnagiri News groundwater level decreased