गुहागर, देवरूखमध्ये आचारसंहिता लागू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

गुहागर - गुहागर, देवरूख, कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुका ६ एप्रिलला होणार आहेत. मतमोजणी ७ एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे शिमगोत्सवानंतर ७ एप्रिलपर्यंत गुहागर, देवरूख व कणकवलीत निवडणुकीचे ढोल वाजणार आहेत.

गुहागर - गुहागर, देवरूख, कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुका ६ एप्रिलला होणार आहेत. मतमोजणी ७ एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे शिमगोत्सवानंतर ७ एप्रिलपर्यंत गुहागर, देवरूख व कणकवलीत निवडणुकीचे ढोल वाजणार आहेत.

प्रारूप मतदारयाद्यांमधील दुरुस्तीबाबत आलेल्या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाल्याने गुहागर, देवरूख व कणकवलीतील नागरिकांना निवडणुकीचे वेध लागले होते. आचारसंहिता घोषित झाल्याने इच्छुक उमेदवारांपैकी पक्षातर्फे कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. पक्षांतर्गत बैठका, वाडी बैठका सुरू झाल्या आहेत. आचारसंहिता सुरू झाल्याने या प्रक्रियेला गती मिळणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी ९ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर करावयाचा आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १२ मार्च ते १९ मार्च असा कालावधी दिला आहे. छाननी २० मार्चला होणार असून २६ मार्चला उमेदवारी मागे घेण्यासाठी अंतिम मुदत असेल. २७ मार्चला निवडणूक चिन्हांचे वाटप होईल, असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

गुहागरमध्ये प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध ३५ नागरिकांनी मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीसाठी अर्ज केले होते. त्यामध्ये १३७ मतदारांच्या प्रभागात बदल सुचविले होते. मात्र त्यावर सुनावणी घेऊन ९३ मतदारांचे प्रभाग निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे बदलले आहेत. ९ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की अंतिम मतदारयादी व संपूर्ण निवडणूक कार्यक्रम गुहागरच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. 

Web Title: Ratnagiri News Guhagar- Devrukh nagarpanchayat Election