आदर्श शिक्षक पुरस्काराची चौकशी करा - यशवंतराव

रवींद्र साळवी
गुरुवार, 25 जानेवारी 2018

लांजा - रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार लांजा पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये कार्यरत शिक्षकाला कोणत्याही शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत नसतानाही दिल्याचे समोर आले आहे.

लांजा - रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार लांजा पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये कार्यरत शिक्षकाला कोणत्याही शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत नसतानाही दिल्याचे समोर आले आहे. तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविताना संबंधित शिक्षकाच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केले आहे. पडताळणी अधिकाऱ्यांनी शिक्षकाच्या शाळेतील उपस्थितीची तपासणी केली नसल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजित यशवंतराव यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी कोकण आयुक्तांकडे केली आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने २०१७ चा आदर्श शिक्षक पुरस्कार लांजा तालुक्‍यातील सुधीन चव्हाण यांना १ मे २०१७ पासून पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये कार्यरत असताना देण्यात आला आहे. पंचायत समितीत कार्यरत असताना सुधीन चव्हाण यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविला होता. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी संतोष कटाळे यांनी सुधीन चव्हाण पंचायत समितीत कार्यरत असताना व कोणत्याही शाळेत अध्यापनाचे कार्य करत नसताना प्रस्तावाची चौकशी न करताच जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. सुधीन चव्हाण यांची कोणतीही चौकशी न करताच यांना आदर्श पुरस्कार जाहीर केला होता.

याबाबत जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये खडाजंगी झाली होती. कोणत्याही शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत नसलेल्या शिक्षकाला पुरस्कार दिलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Ratnagiri News Ideal teacher award issue