काटेसावरच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांची मदत

राजेंद्र बाईत
गुरुवार, 3 मे 2018

राजापूर - लालभडक फुले आणि सदाबहार दिसणारे काटेसावर झाड औषधी आहे. त्याच्या संर्वधनासाठी शासनाच्या पर्यावरण सेवा योजना विभागाने पुढाकार घेतला आहे. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मदतीने बियांची रूजवात केली आहे. त्यातून पाचशेहून अधिक रोपांची निर्मिती झाली आहे.

राजापूर - लालभडक फुले आणि सदाबहार दिसणारे काटेसावर झाड औषधी आहे. त्याच्या संर्वधनासाठी शासनाच्या पर्यावरण सेवा योजना विभागाने पुढाकार घेतला आहे. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मदतीने बियांची रूजवात केली आहे. त्यातून पाचशेहून अधिक रोपांची निर्मिती झाली आहे. या पावसाळ्याच्या सुरवातीला रोपांची लागवड करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण सेवा योजना विभागाचे प्रकल्पाधिकारी दिनेश वाघमारे यांनी दिली. 

हिरव्यागार पानांसह गडद गुलाबी रंगाच्या फुलांनी डवरलेले काटेसावर झाड सार्‍यांचेच लक्ष वेधून घेते. काटेसावर या वनस्पतीचे लेालरु लशळलर (बॉम्बक्स सिबा) असे शास्त्रीय नाव आहे. संपूर्ण काट्याने मढलेली असल्याने मराठीत तिला ‘काटेसावर’, तर संस्कृतात ‘शाल्मली’ म्हटले जाते. झाड कमी पाण्यात आणि कोणत्याही जमिनीत वाढते. झाडाची उंची 20 ते 25 मीटर असते. गडद गुलाबी रंगाची फुले प्राणी-पक्ष्यांचेही लक्ष वेधतात. फुलांवरील मध गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांची गर्दी या झाडावर दिसते.

कोल्हापूर येथील प्रशालेने दिलेल्या बियांची राजापुरातील ससाळे, शिवणे, सोलगाव आणि खारेपाटण (जि.सिंधुदूर्ग) हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी रूजवात केली आहे. त्यातून सुमारे पाचशे रोपे रुजली असून त्यांची लोकसहभागातून लागवड करण्यात येणार आहे

- दिनेश वाघमारे, प्रकल्पाधिकारी

आयुर्वेदीक औषध

फ्रॅक्चर झाल्यावर सावरीच्या जाड सालीचा उपयोग केला जातो. ही फुले वाळवून त्यांच्यापासून रंग तयार करतात. वाळलेल्या पाकळ्यांची पावडर अनेक औषधंमध्ये वापरली जाते. पानांचा काढा कुष्ठरोग, विंचू दंशावर औषध म्हणून उपयोग केला जातो. सावरीचे काटेही औषधी असून सहाणेवर उगळल्यास चंदनासारखा लाल रंग येतो. 

 

Web Title: Ratnagiri News Katesavar conservation students help