आंबेनळी घाट बस अपघातः सव्वीस मृतदेह बाहेर काढण्यात यश 

अमोल कलये 
रविवार, 29 जुलै 2018

रत्नागिरी - आंबेनळी घाटात काल झालेल्या बस अपघातामधील मृतदेह काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आत्तापर्यंत 26 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली. 

रत्नागिरी - आंबेनळी घाटात काल झालेल्या बस अपघातामधील मृतदेह काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आत्तापर्यंत 26 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली. 

ही बस सुमारे 800 फुट खोल दरीत कोसळली आहे. यामुळे तीन टप्प्यात मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. बसच्या खालीही काही मृतदेह अडकले आहेत. एनडीआरएफचे जवान कालपासून या कामात कार्यरत आहेत. त्यांनी रात्री सहा मृतदेह बाहेर काढले. आज या जवानांची दुसरी तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे. आज सकाळी साडेसहा वाचल्यापासून एनडीआरएफचे सुमारे 50 जवान मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याच बरोबर या परिसरातील काही ट्रेकर्स ग्रुप व सामाजिक संस्थाही या कामामध्ये सहभागी झाले आहेत. महाबळेश्‍वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, पोलादपूर, खेड, मुंबई, महाड येथील काही ट्रेकर्स ग्रुपचाही यामध्ये समावेश आहे. कालपासून मंत्री रविंद्र चव्हाण घटनास्थळी असून लागणारी योग्य ती मदत पुरविण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातून 25 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. 

Web Title: Ratnagiri News Konkan Agriculture University Bus accident