कोकणात स्टार्टअपचा गिअर धिम्या गतीवर

मुझफ्फर खान
बुधवार, 20 जून 2018

चिपळूण - केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील १ हजार ७३४ नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी केवळ २०२ नवउद्योजकांना योजनेचा लाभ मिळाला. १ हजार ५३२ नवउद्योजक अद्यापही लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे कोकणात स्टार्टअपचा गिअर धिम्या गतीवर असल्याचे दिसते. 

महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमधील नवउद्योजकांना उद्योग स्थापन्यासाठी अर्थसाह्य व्हावे आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून अर्थसाह्य देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली. परंतु, बहुतांशी बॅंकांकडून या योजनेंतर्गत कर्ज मिळत नाही. कर्ज मिळविण्यासाठी वारंवार बॅंकेचे दरवाजे झिजवावे लागत असल्याने ही योजना कागदावरच असल्याची चर्चा आहे. 

स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी मी आवश्‍यक ती कागदपत्रे पूर्ण करून प्रकरण बॅंकेकडे दाखल केले. त्याला वर्ष झाले तरी अद्याप कर्ज मंजूर झालेले नाही. बॅंकेकडे विचारणा केल्यावर प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे गेल्याचे सांगितले जाते. कर्ज नक्की कधी मिळेल याची माहिती दिली जात नाही. एका प्रकारे नवउद्योजकांची ही थट्टाच सुरू आहे.
- विलास राजेशिर्के,
सावर्डे

जिल्हा    एकूण अर्जदार    लाभार्थी    प्रलंबित अर्ज 
रायगड    ८४६    ७०    ७७६
रत्नागिरी    ५४३    ८३    ४६०   
सिंधुदुर्ग    ३४५    ४९    २९६

Web Title: Ratnagiri News Konkan Startup Gear development slowly