कोकण विधान परिषद जागेसाठी उद्या मतदान

राजेश शेळके
रविवार, 20 मे 2018

रत्नागिरी - कोकण विधान परिषद जागेसाठी उद्या (ता. 21) मतदान होणार आहे. कोकणात 941 मतदार आहेत. शिवसेनेचे राजीव साबळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या महाआघाडीचे अनिकेत तटकरेमध्ये थेट लढत आहे.

रत्नागिरी - कोकण विधान परिषद जागेसाठी उद्या (ता. 21) मतदान होणार आहे. कोकणात 941 मतदार आहेत. शिवसेनेचे राजीव साबळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या महाआघाडीचे अनिकेत तटकरेमध्ये थेट लढत आहे. मतदारांना फोडाफोडीच्या राजकारणापासून बाजूला ठेवण्यासाठी गेली चार दिवस सर्वच पक्षाचे सदस्य अज्ञातवासात आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर सेनेचे राजकीय गणित अवलंबून असले तरी 471 चा मॅजिक आकडा पार करण्यासाठी जोरदार घोडेबाजर सुरू आहे. 

रायगड - रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावच्याच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी रायगड जिल्ह्यातील अ‍ॅड. राजीव अशोक साबळे यांना रिंगणात उतरले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे हा युवा चेहरा रिंगणात आहे.या निवडणुकीत शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र आहे. मतदारांना फोडण्याची राजकीय खेळी सुरू आहे. त्यासाठी मोठमोठे आकडे बाहेर पडत आहेत. फोडाफोडीच्या राजकारणापासून बाजूला ठेवण्यासाठी सेनेचे जिल्ह्यातील मतदार गोवा सहलीवर नेले आहे. मतदाना दिवशीच त्यांना जिल्ह्यात आणण्याची शक्यता आहे. 

पक्षीय बलाबल 

शिवसेना-       309

भाजप-          145

राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप-         275

स्वाभिमान पक्ष -  91

मनसे -           13

उर्वरित- अपक्ष - 108

-------------------

एकूण मतदार -  941

जिल्हा परिषदच्या 55 पैकी शिवसेना 39, राष्ट्रवादी 15, काँग्रेस 1, पंचायत समितीच्या 9 सभापतीत शिवसनेचे 6, राष्ट्रवादीचे 3  आहेत.

रत्नागिरी पालिकेत नगराध्यक्ष, स्वीकृतसह 32 सदस्यांपैकी शिवसेना 20, राष्ट्रवादी 5, भाजपचे 7 आहेत. देवरूख नगरपंचायतीच्या 20 पैकीसेनेची फक्त 4 आहेत. उर्वरित राष्ट्रवादीच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. राजापूर पालिकेत 8, लांजात 11सेना सदस्य आहेत. 

 

Web Title: Ratnagiri News Konkan Vidhan parishad Election