संगमेश्वर तालुका क्रीडा संकुलासाठी कोसुंबच्या पवार बंधुकडून भूदान

प्रमोद हर्डीकर
बुधवार, 31 जानेवारी 2018

साडवली - येथे शासनाच्या धोरणानुसार संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल उभे राहीले आहे. या क्रीडा संकुलासाठी कोसुंब येथील पवार बंधुंनी आपली १० एकर जागा विनामोबदला प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाला दान म्हणून दिली.

साडवली - येथे शासनाच्या धोरणानुसार संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल उभे राहीले आहे. या क्रीडा संकुलासाठी कोसुंब येथील पवार बंधुंनी आपली १० एकर जागा विनामोबदला प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाला दान म्हणून दिली.यानिमित्त त्यांचा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री वायकर यांनी शाल, श्रीफळ देवुन पवार बंधुंचा सन्मान केला. जिल्ह्यातील पहिलेच हे क्रीडा संकुल असुन पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा झाला.

आजच्या युगात साधी एक इंच जागा अशीच कोण देत नाही मात्र पवार बंधुंनी ही जागा दान देवून मनाचा मोठेपणा दाखवला आहे. ही मोठी त्यागाची गोष्ट आहे 

-  रवींद्र वायकर, पालकमंत्री

या क्रीडासंकुलासाठी एक कोटीचा निधी मंजुर झाला होता. चारशे मीटरचा रनिंग ट्रॅक, अत्याधुनिक व्यायामशाळा, सर्व खेळांची मैदाने आता तालुकावासियांसाठी खुली झाली आहेत.
इथे चांगले खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त करुन हे खेळाडू घडवण्यासाठी आपण शासनाकडून आवश्यक निधी मिळवून देवू, असे अभिवचन दिले.

वेळी प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, चिपळुण-संगमेश्वरचे आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, तहसीलदार संदीप कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, साडवली सरपंच सारीका भिंगार्डे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत आदी उपस्थित होते.

 

Web Title: Ratnagiri News land donation by Pawar brothers for Sangmeshwar Krida Sankul