पावस परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पावस - गणेशगुळे, कुर्धेप्रमाणे पावस गावातही बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. संबंधित वनअधिकारी ग्रामस्थांच्या समाधानासाठी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असून पिंजराही लावला आहे; मात्र तो पिंजरा शोभेचा ठरला आहे.

पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील गणेशगुळे, कुर्धेप्रमाणे पावस गावातही बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. संबंधित वनअधिकारी ग्रामस्थांच्या समाधानासाठी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असून पिंजराही लावला आहे; मात्र तो पिंजरा शोभेचा ठरला आहे.

पावस-बौद्धवाडी येथील भिकाजी भिका पावसकर यांच्या गोठ्यातील बकरीचा बिबट्याने फडशा पाडला. त्यांचे १८ हजारांचे नुकसान झाले आहे. गणेशगुळे, कुर्धे परिसरात दररोज दर्शन होते. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. शनिवारी (ता. १६) भिकाजी पावसकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीन बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. वन विभागाचे गावडे, तलाठी भातडे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण शिंदे, महेंद्र गुरव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डोईफोडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

Web Title: ratnagiri news leopard seen in Pawas area