चिपळुण आगाराच्या २५५० फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

चिपळूण -  एसटीच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेसह अन्य पाच संघटनांनी मंगळवारपासून पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशीही सुरू राहिला. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. तीन दिवसात एसटीच्या २५५० फेऱ्या रद्द झाल्यामुळे २४ लाखाचा उत्पन्न बुडाले.

चिपळूण -  एसटीच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेसह अन्य पाच संघटनांनी मंगळवारपासून पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशीही सुरू राहिला. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. तीन दिवसात एसटीच्या २५५० फेऱ्या रद्द झाल्यामुळे २४ लाखाचा उत्पन्न बुडाले. एसटीच्या संघटनेकडून १६ ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला. त्यामुळे मागील तीन दिवसात एसटीला एक टक्काही भारमान मिळू शकले नाही.

परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. त्यामुळे बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कामगार संघटनेची बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत बैठकीतून तोडगा निघाला नाही. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही संप सुरू राहिला. संप करणारे चिपळूण आगारातील कर्मचारी बसस्थानकाच्या परिसरातील हॉटेल आणि चहा, पानटपरीवर बसून होते. ४ वाहतूक नियंत्रक, यांत्रिक विभागाचे ४ कर्मचारी, २ सुरक्षा रक्षक आणि १ वाहतूक पर्यवेक्षक असे ११ कर्मचारी कार्यरत होते. त्यांच्याकडून प्रशासनाची भूमिका जाणून घेतली जात होती. दापोलीतील एसटीच्या गाड्या फोडण्याचा प्रयत्न झाला.

या पार्श्‍वभूमीवर चिपळूण बसस्थानकावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बसस्थानकावर गाड्या उभ्या केलेल्या होत्या त्याठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते. कंट्रोल केबीनच्या ठिकाणी पोलिस व्हॅन उभी करण्यात आली होती. कामावर येणाऱ्या लोकांना बसस्थानकाच्या आवारात सोडले जात होते. साध्या गणवेशात बसस्थानकाच्या आवारात येणाऱ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर होती.

संपाच्या पहिल्या दिवशी चिपळूण आगारातून सहा एसटीच्या फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यानंतर एसटी प्रशासनाची साथ न मिळाल्यामुळे पुढील फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर तीन दिवसात एकही एसटी धाऊ शकली नाही. एसटीची सेवा पूर्णपणे कोलमडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या धोरणांविरोधातही रोष व्यक्त केला. एसटी बस उपलब्ध न झाल्याने लांब पल्याचा प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवासी बसने जाण्यासाठी आगारात येत होते. संप मिटणार नाही याची खात्री पटल्यानंतर ते रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय निवडत होते. त्यासाठी बसस्थानकावर लावलेल्या रेल्वे वेळापत्रकाचाही आधार घेत होते.

११ कर्मचारी हजर
चिपळूण आगारातून दररोज ८५० फेऱ्या सोडल्या जातात. त्यातून दिवसाला ८ लाखाचे उत्पन्न मिळते. तीन दिवसात २२५० फेऱ्या रद्द झाल्याने तब्बल २४ लाखाचे उत्पन्न बुडाले. कास्ट्राईब संघटनेचे ४ आणि शिवसेना पुरस्कृत कामगार संघटनेचे ११ कर्मचारी कामावर हजर होते. 

Web Title: Ratnagiri News Maharashtra State Transport worker on Strike