जैववैद्यकीय कचरा जोग नदीपात्रात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

दापोली - आरोग्यासाठी अतिधोकादायक असणारा जैववैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) शहरातील जोग नदीपात्रात टाकला जात असल्याचे धक्कादायक चित्र दापोलीत दिसते. शहरात बॅंक ऑफ इंडियाच्या मागील बाजूस नदीकाठावर, पात्रात रिकाम्या सलाईनच्या बाटल्या, हॅंड ग्लोव्हज, वापरलेला कापूस आदी जैववैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे.

लोटे येथून महाराष्ट्र बायो हायजेनिक मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीमार्फत दापोलीत जैववैद्यकीय कचरा उचलण्यात येतो. या कंपनीची गाडी आठवड्यातून तीन ते चार वेळा दापोलीत येते. आठवड्यातून किमान तीन वेळा गाडी मेडिकल वेस्ट घेऊन जाते. तरीही कोणत्या वैद्यकीय आस्थापनेकडून हा कचरा नदीपात्रात टाकला जातो, याचा शोध घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. हा कचरा मानवी, जनावरांसाठी अतिशय धोकादायक असतो. संसर्गजन्य रोगांची लागण, श्‍वसन संस्थेसंदर्भात आजार तसेच जनावरे, कोंबड्यांच्या  पोटात कचरा गेल्यास मानवी आरोग्याला धोका होऊ शकतो. आरोग्याशी खेळणाऱ्या या आस्थापनेचा शोध घेऊन कारवाईची मागणी दापोलीवासीयांकडून होत आहे.

उच्चशिक्षितांना स्वच्छतेचे गांभीर्य नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करावी.’’
- प्रशांत परांजपे, अध्यक्ष, निवेदिता प्रतिष्ठान, दापोली

कचऱ्याचा पंचनामा करून दोषींचा शोध घेतला जाईल. मानवी आरोग्यास धोकादायक असलेल्या बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- महादेव रोडगे, मुख्याधिकारी, नगरपंचायत दापोली

बायोमेडिकल वेस्ट जमा करण्यासाठी कचरा गाडी दापोलीत येत असूनही हा कचरा सार्वजनिक जागेत टाकणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- प्रशांत पुसाळकर, सभापती, स्वच्छता व आरोग्य समिती.
 
Web Title: Ratnagiri News Medical waste in Jog river