नाणार प्रश्नी रत्नागिरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्रदिनी उपोषण 

राजेंद्र बाईत
मंगळवार, 17 एप्रिल 2018

राजापूर - शासनाकडून नाणार प्रकल्प कोकणवासीयांवर लादला जात आहे. शासनाच्या या चुकीच्या अणि संदिग्ध भूमिकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र दिनी (ता. 1 मे) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांच्यावतीने एकदिवसीय उपोषण करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राजापूर - शासनाकडून नाणार प्रकल्प कोकणवासीयांवर लादला जात आहे. शासनाच्या या चुकीच्या अणि संदिग्ध भूमिकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र दिनी (ता. 1 मे) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांच्यावतीने एकदिवसीय उपोषण करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नाणार परिसरामध्ये कोणत्याही बागायती नसून, या भागामध्ये मोठ्याप्रमाणात असलेल्या कातळावर हा प्रकल्प उभारले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र ही खोटी माहिती देवून साऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या परिसरात मोठ्याप्रमाणात शेती, आंबा-काजू कलमे असून मच्छीमारीही मोठ्याप्रमाणात केली जाते, असे अजित यशवंतराव यांनी सांगितले. 

 प्रकल्पाची उभारणी करताना जनतेचे मत विचारात घेतले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. त्यानुसार मोठ्याप्रमाणात होणारा लोकांचा विरोध विचारात घेता शासन प्रकल्प रद्दची घोषणा का करीत नाही.

- अजित यशवंतराव, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस 

रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करताना त्यातून कोकणचा विकास होईल, असे मुख्यमंत्री जाहीर करतात. त्याचवेळी प्रकल्पग्रस्तांच्या समितीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रकल्प गुजरातला नेण्याची भाषा करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, हे कळत नाही. शासनाचा हा डाव कोकणवासीय उलथवून लावतील, असा इशारा त्यांनी दिला. त्याऐवजी लांजा-राजापूरात प्रस्तावित असलेली मिनी एमआययडीसी मंजूर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

रिफायनरी प्रकल्पासंबंधी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 8 वाजता एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नगर पालिकेतील गटनेते संजय ओगले उपस्थित होते. 

 

 
 

Web Title: Ratnagiri News Nanar Project and Political Issue