नाणार रिफायनरीविरोधात रत्नागिरीतून जनआंदोलन - उदय सामंत

राजेश शेळके
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नाणार प्रकल्पाविरुद्ध काही संघटनांना बरोबर घेऊन रत्नागिरीतूनही जन आंदोलन उभा करू, ’असा इशारा आमदार उदय सामंत यांनी दिला.  

रत्नागिरी - नाणार रिफायनरीविरोधात शिवसेना मोठा लढा उभारण्याच्या तयारीत आहे.  खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या बरोबर आम्ही आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर मुंबईत झालेल्या बैठकीला मी ही होतो. स्थानिकांचा विरोध असल्यास प्रकल्प लाधणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. प्रकल्प जाणार असे वातावरण असताना अचानक सौदी अरेबियातील कंपनीशी करार केला गेला. स्थानिकांची ही फसवणुक आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पाविरुद्ध काही संघटनांना बरोबर घेऊन रत्नागिरीतूनही जन आंदोलन उभा करू, ’असा इशारा आमदार उदय सामंत यांनी दिला.  

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाणार रिफायनरी प्रकल्प उभारणीच्यादृष्टीने नुकताच सौदी अरेबियातील कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला. सेनेला याबाबत अंधारत ठेवण्यात आले. त्यामुळे सेना पेटून उठली आहे. सेनेच्या अनेक नेत्यांनी भाजपच्या नेत्यांविरुद्ध तिखट प्रतिक्रिया दिल्या. अजूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सौदीच्या राजाला खुश करण्यासाठी नाणारवासीयांचा बळी जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी दिली. तर रिफानरीच्या अधिकार्‍यांना इकडे फिरकु देणार नाही, असा इशारा देत आमदार राजन साळवी यांनी कंपनीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. 

आमदार उदय सामंत म्हणाले,“रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे आणि नाणारच्या संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मी होतो. स्थानिकांची बाजू जेव्हा ऐकून घेतली तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, स्थानिकांचा विरोध असल्यास आम्ही त्याच्यावर प्रकल्प लाधणार नाही. आता अचानक सौदीतील कंपनीशी करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री स्थानिकांची दिशाभुल करीत आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी याच्याबरोरब आम्ही आहेच. परंतु हा लढा आजून तीव्र करण्यासाठी विविध संघटना बरोबर घेऊन रत्नागिरीतूनही नाणार विरुद्ध लढा उभा करण्यात येणार आहे.

Web Title: Ratnagiri News Nanar Project Issue Uday Samant Press