कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे सेनेकडून? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी -  कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथमच शिवसेना पूर्ण ताकदीने उतरली आहे. शिवसेनेची काही वेगळी गणिते मांडली जात आहेत. विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे सेनेकडून निवडणूक लढवण्याची जोरदार चर्चा आहे. युवा सेनेकडून त्यासाठी मतदारनोंदणी करण्याची मोहीम युद्धपातळवीर हाती घेतली आहे. अतिशय नियोजनबद्ध काम सुरू झाले आहे. 

रत्नागिरी -  कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथमच शिवसेना पूर्ण ताकदीने उतरली आहे. शिवसेनेची काही वेगळी गणिते मांडली जात आहेत. विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे सेनेकडून निवडणूक लढवण्याची जोरदार चर्चा आहे. युवा सेनेकडून त्यासाठी मतदारनोंदणी करण्याची मोहीम युद्धपातळवीर हाती घेतली आहे. अतिशय नियोजनबद्ध काम सुरू झाले आहे. 

युवा नेते योगेश कदम यांना आमदार उदय सामंत यांच्यासह सर्व आमदारांचा व इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा उत्साही आहे. त्यामुळे नोंदणीचे काम अतिशय नियोजबद्ध सुरू आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे आहेत. या निवडणुकीत शिवसेना आधी उतरलेली नव्हती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप यांच्यातच ही लढत होत होती. त्यामुळे सहकार क्षेत्रानंतर या पदवीधर मतदारसंघातही सेना उतरली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असे जिल्हे येतात. यामध्ये ठाणे आणि पालघरमध्ये मतदारसंख्या अधिक असते. या निवडणुकीकरिता नव्याने मतदारनोंदणी करणे आवश्‍यक असल्याने योगेश कदम जिल्हाभर दौरे करीत आहेत. त्यांनी युवा सेनेतर्फे ही नोंदणी करण्याचे नियोजनबद्धरीतीने काम सुरू केले आहे.

युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबर जिल्हा सेना संपर्कप्रमुख विजय कदम हेसुद्धा सातत्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून मतदारनोंदणीचा आढावा घेत आहेत. 

मतदार नोंदणीवर भर 
जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख आदींकडूनही या नोंदणीवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून काल योगेश कदम यांनी लांजा, रत्नागिरी तालुक्‍यांचा दौरा केला. उदय सामंत, तुषार साळवी यांच्याशी चर्चा करून नोंदणीचे नियोजन केले. उमेदवार कोण याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शिवसेनेकडून निरंजन डावखरे यांचे नावही असू शकते, असे सूचक विधान नेत्यांनी केले. 

Web Title: Ratnagiri news Nirjan Davkhare in race of konkan padvidhar election