आंजर्ले, केळशी, मुरूड, हर्णै नकाशावर आणणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

दाभोळ - दापोली तालुक्‍याची प्रमुख ओळख असलेले आंजर्ले, केळशी, मुरूड, हर्णै व कोळथरे ही गावे राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी निर्मल सागर तट अभियानासाठी निवडण्यात आली आहेत. या ग्रामपंचायतींना ‘अ’ व ‘ब’ दर्जा देण्यात आला आहे. या अभियानाच्या निधीतून पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटनात वाढ होऊन दापोली तालुक्‍यातील पर्यटनाला गती मिळणार आहे.

या निवडक अशा ‘अ’ दर्जा प्राप्त ग्रामपंचायतींना १५ लक्ष, तर ‘ब’ दर्जा प्राप्त ग्रामपंचायतींना १० लक्ष एवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी कुठे व कशासाठी वापरावा यासाठी नियमावली तयार केली आहे. यामध्ये ४० टक्‍के रक्‍कम ग्रामपंचायतींनी पर्यटकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा, किनारा स्वच्छता, स्थानिकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण यावर खर्च करायचा आहे.

हे अभियान महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. या अभियानात पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींचा पर्यटन, परिवहन, पर्यावरण, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, कौशल्य विकास या प्रमुख बाबींवर भर देण्यात आला आहे. जेणेकरून या समुद्रकिनारी देशी पर्यटकांबरोबर विदेशी पर्यटकही कोकणात मोठ्या प्रमाणात येऊन पर्यटन व्यवसाय हा कोकणातील प्रमुख व्यवसाय म्हणून भविष्यात पुढे येऊ शकेल. या योजनेत रत्नागिरी जिल्ह्यातून २६ ग्रामपंचायतींसह कोकणातील पाच जिल्ह्यांमधून ७२ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.

या सर्व ग्रामपंचायतींचे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय मूल्यमापन समित्या मूल्यांकन करणार आहेत. या मूल्यांकनातून १ मे रोजी सर्वोतम ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या २६ ग्रामपंचायतीमधून महाराष्ट्र सागरी महामंडळाने आंजर्ले, केळशी, मुरूड, हर्णै व कोळथरे या ग्रामपंचायती आयएसओ मानांकनासाठी निवडल्या असून या ग्रामपंचायतींना मानांकन प्राप्त करून या ग्रामपंचायती जगाच्या नकाशावर आणण्याचे ठरविले आहे.

Web Title: Ratnagiri News Nirmal Sagar Abhiyan