पंडित भीमसेनजींच्या पाऊलखुणा शोधतोय - पंडित उपेंद्र भट

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 27 जुलै 2018

रत्नागिरी - 'संगीत कला आहे, तशीच ती जीवनशैली आहे. श्रेष्ठ गुरू संगीत जगतात, त्यांचा प्रभाव शिष्यांच्या जीवनावरही पडतो. त्यातून सांगीतिक जीवन सर्वार्थाने समृद्ध होते. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी संगीतच नव्हे, तर जीवनशिक्षण दिले. त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारले, घडविले हा भाग्ययोगच आहे. आम्हा शिष्यांच्या समोर ते सर्वार्थाने आदर्श आहेत. त्यांच्या पाऊलखुणांचा शोध हेच आमच्या आयुष्याचे ध्येय आहे,' अशी भावना गायक पंडित उपेंद्र भट यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त व्यक्त केली.

येथील यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीतर्फे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी मैफल पं. भट रंगवणार आहेत. शनिवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजता शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात मैफल होईल. श्री. भट मंगळूरमध्ये पंडितजींच्या गाण्याने प्रभावित झाले. यानंतर १९६५ मध्ये सर्वप्रथम त्यांना तानपुऱ्याची साथ केली. सुरवातीला ज्येष्ठ शिक्षक पं. माधवगुडी व नंतर तीन तपे भीमसेनजींकडे संगीत शिकले.

श्री. भट म्हणाले, पंडितजींनी शास्त्रीय गायनातील उत्तुंग स्थान गाठत असतानाच ख्याल, ठुमरी, दादरा, भावगीत हे प्रकार आत्मसात केले. मराठी आणि कानडी भक्तिसंगीतातील तर ते एव्हरेस्ट शिखर मानले पाहिजेत.

भीमसेनी शैलीचा पाईक
किराणा घराणा गायकी पंडितजींमुळे समृद्ध झाली. इतर घराण्यांमधले गायकीचे सौंदर्य निवडून आपल्या शैलीमध्ये मिसळल्यामुळे पंडितजींनी ‘भीमसेनी’ शैली प्रसिद्ध केली. मी या शैलीचा पाईक आहे, याचा मला अभिमान आहे. 

Web Title: Ratnagiri News Pandit Upendra Bhat Guru Pournima special