रत्नागिरीत विठ्ठल मंदिराजवळ राडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

रत्नागिरी - रांगोळी पुसेल जरा, बाजूनी जा, असे हटकल्याच्या रागातून शहरातील विठ्ठल मंदिर येथे जोरदार राडा झाला. एका टोळक्‍याने रांगोळी काढण्याऱ्या काही तरुणांवर हॉकी स्टीक, काठ्या आदींनी हल्ला केली. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले.

रत्नागिरी - रांगोळी पुसेल जरा, बाजूनी जा, असे हटकल्याच्या रागातून शहरातील विठ्ठल मंदिर येथे जोरदार राडा झाला. एका टोळक्‍याने रांगोळी काढण्याऱ्या काही तरुणांवर हॉकी स्टीक, काठ्या आदींनी हल्ला केली. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले.

शहर पोलिस ठाण्यात यासंदर्भात चिम्या साबळेसह १६ जणांविरुद्ध खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला असून तीन संशयितांना अटक केली आहे. नगरसेवक राजेश कृष्णा तोडणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली आहे. गुढीपाडव्यानिमित्त मराठी नव वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील विठ्ठल मंदिर येथील रस्त्यांवर रांगोळी काढण्यात येत होती. पराग तोडणकर, पराग हेळेकर, केदार मयेकर, मंदार मयेकर, आदित्य पांचाळ, सुधीर सावंत आदीचा यामध्ये समावेश होता. या दरम्यान तेथे मोटारीतून चिम्या साबळे उतरला. 

रांगोळी पुसेल जरा बाजूनी जा, असे एका तरुणाने हटकले. चिम्या साबळे आणि त्या तरुणांमध्ये यावरून वादावादी आणि शिवीगाळ झाली. ‘तु थोडावेळ थांब तुला ठारच मारतो’, अशी धमकी देऊन साबळे निघून गेला. पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

रात्री सव्वा बारा वाजता चिम्या साबळे, नागेश गजबवार, स्वप्नील साबळे, प्रवीण साबळे, शुभम साळवी, स्मित साळवी, मयुर भुवड, इंद्रनिल साबळे, अथर्व खेडेकर, उदय सावंत व अन्य ६ जण (सर्व रा. झाडगाव, रत्नागिरी) हे गैरकायदा जमाव करून तिथे आले. त्यांनी मंदार मयेकर, आदित्य पांचाळ, पराग तोडणकर, समीर तिवरेकर आणि सुनील सावंत आदींनी हॉकी स्टीक, काठ्या आदींनी मारहाण केली.

यामध्ये पाचजण जखमी झाले. एकाच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तक्रारीवरून खुनी हल्ला केल्याचा गुन्हा १६ जणांविरुद्ध नोंदविला आहे. पोलिसांनी संशयित चिम्या साबळे, श्री. साळवी आणि स्तिम साळवी या तिघांना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक नितीन ढेरे याचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Ratnagiri News quarrel near Vithal Temple