आमदार कदम यांच्याविरुद्ध रामदास कदम यांचा दहा कोटींचा मानहानीचा दावा

गोविंद राठोड
बुधवार, 19 जुलै 2017

दाव्याचा निकल लागलेला नसताना भुवड तसेच आमदार संजय कदम यांनी उपोषण करून राजकीय आंदोलन केले.

खेड : आमदार संजय कदम यांनी योगिता दंत महाविद्यालयाच्या जागे विषयी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची  मानहानी केल्याप्रकरणी  दहा कोटिं चा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे, अशी माहिती  पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज दिली.

ते म्हणाले की, "१ मे ला आत्माराम भुवड यांनी उपोषण केले होते. त्याला आमदार संजय कदम यांनी जाहिर पाठिंबा दिला होता. यावेळी माझी वृतपत्रातून तसेच टीव्हीवरून संपूर्ण देशात बातम्या देऊन बदनामी करण्यात आली." डेंटल कॉलजची जागा खरेदी रीतसर करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

डेंटल कॉलेजची जागा मी २००५ मध्ये घेतली व २००७ मध्ये बांधकाम सुरू केले. ते काम २०१२ मध्ये पूर्ण झाले. आणि २०१३ मध्ये आत्माराम भुवड यांनी तक्रार केली. सदरचा दावा खेडच्या न्यायालायत अजूनही प्रलंबित आहे. हा दाव्याचा निकल लागलेला नसताना भुवड तसेच आमदार संजय कदम यांनी उपोषण करून राजकीय आंदोलन केले. याविरुद्ध देखील खेडच्या न्यायालयात 13 जुलैला दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने हा दावा स्वीकारला असल्याचे ते म्हणाले.

त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयानेही दहा कोटींचा दावा दाखल करून घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. संजय कदम यांनी केलेले आरोप तसेच माझी केलेली बदनामी याचे पुरावे सीडी, विडिओ वैगैरे न्यायालयात पुरावे म्हणून देण्यात आले आहेत. न्यायालय योग्य तो निर्णय देईल यात शंका नाही.⁠⁠⁠

Web Title: ratnagiri news ramdas kadam 10 crore defamation case against sanjay kadam