कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी राणे यांचा राष्ट्रवादीला पाठींबा

अमोल कलये
बुधवार, 9 मे 2018

रत्नागिरी - विधानपरिषद निवडणूकीत कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीला पाठींबा दिला आहे. सुनिल तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीकडून लढत आहेत. त्यांना पाठींबा दिला आहे. 

स्वाभिमान पक्षाकडे 82 मते आहेत. त्यांची मते राष्ट्रवादीसाठी निर्णायक ठरु शकतात. मंगळवारी नारायण राणे आणि अनिकेत तटकरे यांची भेट झाली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

नारायण राणे यांच्या भूमिकेवर सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी तोंडसुख घेतले आहे. नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत. भाजपच्या विरोधात कुरघोडी करायला नारायण राणे यांनी सुरुवात केली आहे. त्याची गंभीर दखल भाजप नेतृत्व घेऊल त्यामुळे राणेंना जवळ केल्याने डोकेदुखी, मनस्ताप हे भाजपच्या नेत्यांना आता समजले असेल, असे राऊत म्हणाले.  

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत शिवसेनेने राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे. आमचे गणित हे नेहमीच बेरेजेचे राहीले आहे. वजापाकी आमच्याकडे नाही. असेही राऊत म्हणाले.

कोकणच्या विकासाच्या आड येणारा एकमेव माणूस म्हणजे सुनील तटकरे आहेत. सिंचन घोटाळ्यात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे कोकणच्या अनेक योजना रखडल्या आहेत. कोकणाच्या मुळावर एकमेव आड येणारा माणूस म्हणजे सुनील तटकरे.
 - विनायक राऊत
, खासदार 

Web Title: Ratnagiri News Rane - Tatkare meeting