रावण कातळचित्राच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

मकरंद पटवर्धन
मंगळवार, 22 मे 2018

राजापूर - अश्मयुगातील व चुंबकीय विस्थापन असलेल्या रावण कातळचित्राच्या संवर्धनासाठी देवाचे गोठणे- देऊळवाडी येथील जागामालक, ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. निसर्गातील हा चमत्कार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भार्गवराम मंदिराजवळ इंग्रजी, मराठीतून माहितीचा फलक लावण्यात आला. या फलकाचे अनावरण परदेशी पर्यटक व इंडॉलॉजीस्ट डॉ. निकोलस डिजेने यांनी केले.

डॉ. निकोलस यांनी भगवान परशुरामावर पीएचडी केली. पुढील संशोधनासाठी त्यांनी भार्गवराम मंदिराला भेट दिली. मंदिरापासून दहा मिनीटांच्या अंतरावर कातळचित्र आहे. जांभ्या दगडातील चुंबकीय विस्थापन दर्शवणारी ही भारतातील एकमेव जागा आहे. जगात अशी जागा असण्याची कुठेही नोंद नाही.

श्री. रिसबुड व सहकार्‍यांनी गावकर्‍यांना चित्रांचे महत्त्व, त्यातून पर्यटन व आर्थिक विकासासंदर्भात मार्गदर्शन केल्यानंतर देवाचे गोठणे ग्रामस्थांनी तयारी दर्शवली. देवाचे गोठणे गावचे सरपंच कमलाकर गुरव, सदस्य रविकांत लिंगायत, देऊळवाडी ग्रामस्थ, जागामालक नीलेश आपटे, सौ. आपटे, त्यांच्या मातोश्री, तसेच कातळ चित्रांचे शोधकर्ते सुधीर रिसबुड, धनंजय मराठे, पुरातत्त्व खात्याचे समन्वयक ऋत्विज आपटे, महाराष्ट्रातील प्रख्यात इंडॉलॉजीस्ट आशुतोष बापट उपस्थित होते.

यापूर्वी उक्षी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता. जागतिक वारसा जपण्याकरिता लोकप्रतिनिधी, पर्यटन विकास महामंडळाकडून फारसा पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. आता देवाचे गोठणे येथील ग्रामस्थांनी कुठल्याही सरकारी मदतीशिवाय विकासासाठी पुढे सरसावले आहेत. ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी काही शासकीय अधिकारी व्यक्तीगत पातळीवर मदत करत आहेत.

रावण कातळचित्रासारख्या मनापासून अभिनंदन. भार्गवराम मंदिराने येथील प्राचीन वारसा लक्षात येतो. तो अभ्यासकांना उपयुक्त आहे. फलक अनावरण करण्याचा मान दिल्याबद्दल आभार.

- डॉ. निकोलस

Web Title: Ratnagiri News Ravan Katal Shilp conservation