फणशी येथे नदी पुनरुज्जीवन अभियानाला वेग

मकरंद पटवर्धन
रविवार, 20 मे 2018

रत्नागिरी - फणशी येथे नदी पुनरुज्जीवन अभियानाला वेग आला आहे. 5 जूनपर्यंत शासकीय तंत्रनिकेतचे आजी - माजी विद्यार्थी हे अभियान राबवणार आहेत. या कामासाठी रत्नागिरीकरांनी थोडा वेळ श्रमदानासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी - फणशी येथे नदी पुनरुज्जीवन अभियानाला वेग आला आहे. 5 जूनपर्यंत शासकीय तंत्रनिकेतचे आजी - माजी विद्यार्थी हे अभियान राबवणार आहेत. या कामासाठी रत्नागिरीकरांनी थोडा वेळ श्रमदानासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय तंत्रनिकेतनचे विद्यार्थी 5 जूनपर्यंत दररोज सकाळी 8 ते 10.30 वाजेपर्यंत श्रमदान करणार आहेत. यापूर्वी फणशी येथे रिड बेड बंधारा बांधून प्रदूषित पाण्याची तीव्रता कमी करण्यात आली होती. त्यानंतर विविध सामाजिक संस्थांनीही या उपक्रमात सहभाग घेण्याचे ठरवले.

 

आज नदीच्या झर्‍यांना मोकळा श्‍वास द्यायचा या इराद्याने 15 विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते कामाला लागले. मात्र चार दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे सांडपाण्याचा नाला तुडूंब वाहत आहे. गटार आहे याची चिंता न करता ते या पाण्यात उतरले. सांडपाणी स्वच्छ पाण्यात मिसळणारी नाही याची दक्षत या विद्यार्थांनी घेतली.

नदीच्या उगमस्थानाजवळ गाळ साचला आहे. गाळ काढण्यासह झरे मोकळे करणे, सांडपाण्याच्या नाल्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या नदीचे पाणी अडवण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला होता. त्यातूनच शिरगाव जॅकवेलला पुरवठा व्हायचा. नदी पुनरुज्जीवनामुळे जॅकवेलला शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे.

शहरीकरणाचा माणूसकीचा स्पर्श हरवला तर काय भयंकर परिस्थिती होते ते मुंबईच्या नद्या, गंगा अनुभवत आहे. रत्नागिरीत अशी स्थिती उद्भवू नये, याकरिता रत्नागिरीकरांनी फणशी येथे श्रमदान करावे.

- साईल शिवलकर

 

Web Title: Ratnagiri News River revival Campaign in Phanshi