आमच्याबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

चिपळूण - आमची निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख आणि कार्यकर्त्यांना माहीत आहे. सोशय मीडिया वा इतर माध्यमांतून आमच्याबद्दल संशय निर्माण करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल, तर तो कदापि यशस्वी होणार नाही. आमचे शिवसैनिकही सहन करणार नाहीत, अशी तिखट प्रतिक्रिया आमदार सदानंद चव्हाण आणि आमदार राजन साळवी यांनी दिली.

चिपळूण - आमची निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख आणि कार्यकर्त्यांना माहीत आहे. सोशय मीडिया वा इतर माध्यमांतून आमच्याबद्दल संशय निर्माण करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल, तर तो कदापि यशस्वी होणार नाही. आमचे शिवसैनिकही सहन करणार नाहीत, अशी तिखट प्रतिक्रिया आमदार सदानंद चव्हाण आणि आमदार राजन साळवी यांनी दिली.

इंदापूर तालुक्‍यातील कळस येथे नेचर डिलाईट डेअरीचे उद्‌घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. डेअरीचे मालक अर्जुन देसाई यांनी उद्‌घाटन कार्यक्रमासाठी राज्यातील जवळच्या आमदारांना बोलविले होते. रत्नागिरी जिल्ह्यातून सदानंद चव्हाण आणि राजन साळवी या कार्यक्रमाला उपस्थित होते. अजित पवार उद्‌घाटन कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा लवकर पोचले. त्यामुळे उद्‌घाटन कार्यक्रमाअगोदर डेअरीचा परिसर पाहण्याचे ठरले. माणसे जास्त आणि वाहने कमी असल्यामुळे गर्दी लक्षात घेता अजित पवार यांनी आपल्या चालकाला गाडीतून उतरविले आणि स्वतः गाडीचा ताबा घेतला. अजित पवारांच्या गाडीतून आमदार राजन साळवी व सदानंद चव्हाण यांनी डेअरीचा फेरफटका मारला. 

याची नोंद घेत सोशय मीडियावर पतंग उडवण्यात आले. त्यावर उलटसुलट चर्चाही सुरू आहे. याबाबत राजन साळवी यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, डेअरीच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम पक्षविरहित होता. ८० एकरचा परिसर पायी फिरणे शक्‍य नव्हते. अजित पवारांनी आपल्या गाडीत बसण्याची विनंती केली म्हणून आम्ही त्यांच्या गाडीत बसलो. इतर पक्षांचे आमदारही एकाच गाडीतून एकत्रित गेले. या विषयाचे कोणी राजकारण करू नये.

शिवसेनेसाठी आमदार सदानंद चव्हाण आणि राजन साळवी यांचे काय योगदान आहे, पक्षावर आमची निष्ठा किती आहे याची माहिती पक्षप्रमुख आणि आमच्या कार्यकर्त्यांना आहे. मीडियाचा वापर करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही.
- सदानंद चव्हाण, आमदार चिपळूण

संशयाचे वातावरण निर्मिण्याचा प्रयत्न
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तोंडावर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. हे दोघे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या गाडीत बसले, याचे निमित्त करून काहीजण त्यांच्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.

Web Title: Ratnagiri News Sadanad Chavan Comment