मिऱ्या बंधाऱ्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

रत्नागिरी - समुद्राच्या उधाणात वाहून गेलेला मिऱ्या-पंधरामाड येथील बंधाऱ्यांची कायमस्वरुपी दुरुस्ती करून घ्यावी, असे आदेश खासदार विनायक राऊत यांनी पतन अधिकारी श्री. पाताडे यांना दिले. बंधाऱ्यांची पाहणी केल्यानंतर खासदारांनी मिऱ्या येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

अमावस्येच्या पहिल्याच उधाणात पंधरामाड येथील संरक्षक बंधारा उद्ध्वस्त केला. मोठ मोठे दगड अजस्त्र लाटांनी वाहून नेले. त्यानंतर पतन विभागाने तेथे तात्पुरती मलमपट्‌टी केली आहे. आज खासदार राऊत यांनी समुद्राच्या लाटांचा अनूभव घेतला. सध्या टाकलेले दगड पुन्हा वाहून जातील अशी भीतीही व्यक्‍त केली. मिऱ्या ग्रामस्थांसह जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. सावंत यांनी बंधारा सातत्याने उध्वस्त होत असल्याचे सांगितले. मिरकरवाडा फेज २ मध्ये उभारलेल्या जेटींमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पतनचे अधिकारी श्री. पाताडे यांच्याशी शासकीय विश्रामगृहात श्री. राऊत यांनी संवाद साधला. वाहून गेलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध आहे. एक कोटी रुपये कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात दोनच कंत्राटदार होते; त्यामुळे ती प्रक्रिया पुन्हा केली जाणार आहे. प्रत्येकी एक टनाचा असे मोठे दगड तिथे टाकण्यात येणार आहेत. हा बंधारा मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे श्री. पाताडे यांनी सांगितले. लाटांचा वेग लक्षात घेता तिथे टेट्रापॉड टाकण्याची सूचना ग्रामस्थांनी केली होती. त्यावर खासदारांनी चर्चा केली; मात्र त्यासाठी निधीची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण बंधाऱ्यासाठी शेकडो टेट्रापॉड टाकावे लागतील असे स्पष्ट केले.

Web Title: Ratnagiri news sea