स्टंट रोखण्यासाठी पानवल, उक्षी धबधब्यांवर रक्षक

राजेश कळंबटे
सोमवार, 11 जून 2018

रत्नागिरी -  सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे वाहू लागले आहेत. त्याची भुरळ पर्यटकांसह तरुणाईला पडते. तेथे अतिउत्साही तरुण बेभानपणे जिवावर बेतणारे स्टंट करतात. त्याला घालण्यासाठी पानवल, उक्षी धबधब्याच्या ठिकाणी किनार्‍यांप्रमाणे जीवरक्षक नेमण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयाने केला आहे. ग्रामपंचायतींकडून ही मागणी होत असून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.

गतवर्षी ग्रामीण पोलिसांनी या धबधब्यांवर फलक लावले होते. तसेच दारू पिणार्‍यांची ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणीही केली जात होती. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक गर्दी पानवल, उक्षीसह निवळीतील धबधब्यांवर होते. दर रविवारी महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा सर्वाधिक समावेश असतो. गतवर्षी उक्षी येथे दोन तरुण वाहून गेले तर पानवल धबधब्यावर एका तरुणाने अतिउत्साहाच्या धुंदीत उंच खडकावरून पाण्यात उडी मारली. त्यात तो जखमीही झाला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरला झाला होता. त्याची गंभीर दखल ग्रामीण पोलिसांनी घेत धबधब्यांच्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत जाणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला होता.

जिल्ह्यातील किनार्‍यांवर सुरक्षेसाठी जीवरक्षक नेमण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्याच धर्तीवर पावसाळ्याच्या चार महिन्यात धबधब्यांच्या ठिकाणीही असे रक्षक ठेवले जावेत असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्याला ग्रामपंचायतींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तहसीलदारांकडे प्रस्ताव आल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. या रक्षकांच्या मानधनाचा प्रश्‍न कसा सोडवायचा याबाबत प्रशासकीय स्तरावर चर्चा केली जाणार असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले.

धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. अतिउत्साहाच्या धुंदीत केलेल्या स्टंटमुळे दुर्घटनाही घडू शकते. त्याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींच्या मागणीवरुन रक्षक नेमण्याचा विचार सुरू आहे.

- मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार

Web Title: Ratnagiri News security guard on Panval and Ukshi waterfall