वृद्धाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

रत्नागिरी - आठ वर्षांच्या चिमुरडीला शेजारी राहणाऱ्या वृद्धाने जबरदस्तीने शौचालयात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. अलोरे (ता. चिपळूण) येथे हा गंभीर प्रकार घडला.

रत्नागिरी - आठ वर्षांच्या चिमुरडीला शेजारी राहणाऱ्या वृद्धाने जबरदस्तीने शौचालयात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. अलोरे (ता. चिपळूण) येथे हा गंभीर प्रकार घडला. हा प्रकार न सांगण्यासाठी चिमुरडीला वृद्धाने अमानुष मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. पीडित रत्नागिरीत आजीच्या घरी राहण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. आजीने चिमुरडीला घेऊन तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून संशयित वृद्धावर गुन्हा दाखल केला.

झिरो क्रमांकाने हा गुन्हा अलोरे पोलिसांकडे वर्ग केला. सुजया (वय ५५ ते ६०) असे वृद्धाचे नाव आहे. पीडित मुलीच्या आजीने ही तक्रार दाखल केली. पीडित मुलीला शाळेला सुटी पडल्याने आजीने तिला राहण्यासाठी येथे आणले. मात्र, मुलीची प्रकृती अचानक बिघडली. आजीने पीडितेला तत्काळ डॉक्‍टरांकडे नेले. तरीही मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आजीने विश्‍वासात घेऊन मुलीला विचारणा केली.

यावेळी मुलीने खरी हकिकत सांगितली. घराशेजारी राहणाऱ्या सुजया नामक वृद्धाने आपल्याला जबरदस्तीने घराच्या शौचालयात नेऊन तोंड दाबून अतिप्रसंग केला. तसेच मारहाण करत याबाबत कोणाला माहिती दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याची माहिती मुलीने दिली. एप्रिलमध्ये झालेल्या घटनेची मे महिन्यात माहिती समोर आली. 

Web Title: Ratnagiri News sexual harassment incidence