मुंबईप्रमाणे पुणे मार्गावरही ‘शिवशाही’ची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

रत्नागिरी - रत्नागिरी एस.टी. विभागाच्या ताफ्यातील पहिली ‘शिवशाही’ बस रविवारी (ता. ११) रत्नागिरीतून मुंबईला रवाना होणार आहे. सायंकाळी ४ वाजता मुख्य बस स्थानकात रत्नागिरीवासीयांना ही बस पाहता येणार असून, तिचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. रत्नागिरीतून सुटल्यावर संगमेश्‍वर, चिपळूण, रामवाडी व पनवेल हे चार थांबेच ‘शिवशाही’ घेणार आहे. मुंबईप्रमाणे पुणे मार्गावरही ‘शिवशाही’ची प्रवाशांची मागणी आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कमी तिकीटदरामध्ये सर्वांत जास्त सोयीसुविधा देणारी ही बस असून, मुंबईचे तिकीट ५४६ रुपये आहे. निमआराम बसचे तिकीट ५१६ रुपये आहे. म्हणजेच ‘शिवशाही’चे तिकीट फक्त ३० रुपयांनी जास्त आहे. संगणकीय आरक्षणातून ११ प्रवाशांनी पहिल्या फेरीचे आरक्षण केले आहे. 

शनिवारी (ता. १०) ही बस मुंबईतून रत्नागिरीत येणार आहे. रत्नागिरीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर पहिली फेरी रविवारी रात्री १० वाजता मुंबईला सुटणार आहे.

Web Title: ratnagiri news shivshahi bus ratnagiri