बोगस जमिन व्यवहारातूनच कुसुरकर यांचा खुन

संदेश सप्रे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

संगमेश्‍वर - स्मिता कुसुरकर यांच्याशी उमरे येथील जमिनीचा केलेला बोगस व्यवहार अंगाशी येईल आणि त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत द्यावे लागतील या भितीने कुसुरकर यांचा खुन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक प्रणय अशोक यांनी आज दिली. 

संगमेश्‍वर - स्मिता कुसुरकर यांच्याशी उमरे येथील जमिनीचा केलेला बोगस व्यवहार अंगाशी येईल आणि त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत द्यावे लागतील या भितीने कुसुरकर यांचा खुन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक प्रणय अशोक यांनी आज दिली. 

यातील संशयीत आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक प्रणय अशोक आणि अपर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणसह संगमेश्‍वर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करण्यात आला.

स्मिता कुसुरकर बेपत्ता असल्याची तक्रार 16 जुलैला
ना. म. जोशी पोलिस ठाणे मुंबईत करण्यात आली. स्मिता या आपण रत्नागिरी येथे जात असल्याचे सांगुन घराबाहेर पडल्या होत्या. त्यांनी संगमेश्‍वरात जमिन व्यवहार केल्याचे नातेवाईकांना माहित होते. यावरून त्यांनी 24 जुलैला संगमेश्‍वर पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी पोलिस अधिक्षक कार्यालयात स्वतः येऊन
निवेदन दिले होते. या निवेदनासोबत संगमेश्‍वर तालुक्यातील उमरे गावातील जमिन संदर्भातील सातबारा उतारे व बाळा वजुद्दीन मोडक रा. कसबा यांच्या नावाने जमिन व्यवहार संदर्भात केलेला बाँडपेपर जोडण्यात आला होता. पोलिस अधिक्षक प्रणय अशोक आणि अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे यांनी हे निवेदन व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रतींचे अवलोकन करून त्याप्रमाणे पुढील चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक शिरीष सासणे व संगमेश्‍वर झावरे यांना सुचना
दिल्या. 

कागदपत्रांची तपासणी 
त्याप्रमाणे निवेदनासोबत जोडलेला सातबारा उतारे, बाँड पेपरव्दारे करण्यात आलेला करार यांची सत्यता पडताळण्यात आली. यावरून करार लिहून देणार बाळा वजुद्दीन मोडक (रा. कसबा) हे हयात नसुन त्यांच्या कुटुंबियांनी असा कोणताही
व्यवहार केलेला नसल्याचे निष्पन्न झाले. स्मिता यांना जमिन खरेदी करून देतो असे सांगुन बनावट नावे बाँडवर लेखी करार करून त्यांचेकडून कोणीतरी 22 लाख 50 हजार रूपये स्विकारले होते. अज्ञात व्यक्तीने जमिन विक्रीचा बनाव करून ही रक्कम स्विकारल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले. हा बनाव उघडकीस येईल व स्विकारलेली रक्कम स्मिता यांना परत करावी लागेल या भितीने त्यांना संपविण्यात आल्याचे दिसुन आले.

श्रीकांत घडशीचा संबंध 

स्मिता यांच्या नातेवाईक यांनी निवेदनासोबत जोडलेल्या सर्व जमिन व्यवहारातील कागदपत्रांची बारकाईने तपासणी करता त्यात श्रीकांत घडशी याचा संबंध असल्याचे दिसुन आले. श्रीकांत घडशी बाबत चौकशी करता तो मुंबईत वास्तव्यास असल्याचे व त्याने 2009 मध्ये आपल्या पत्नीला जीवे मारून तिला विहिरीमध्ये फेकुन दिलेले होते. त्याबाबत संगमेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. यावरून या प्रकरणात श्रीकांत याचाच हात असल्याचा संशय बळावला. त्याला 29 जुलै रोजी गुन्हे अन्वेषण शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत आपणच कुसुरकर यांना ठार मारल्याची कबुली देत तिचे प्रेत माभळे सडा येथील चिरेखाणीत पुरल्याचे सांगितले.

Web Title: Ratnagiri News Smita Kusurkar Murder followup