राष्ट्रीय पातळीवर कोकणी चेहरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम तऱ्हेने जबाबदारी सांभाळली. तटकरेंच्या रूपाने राष्ट्रीय पातळीवर कोकणी चेहरा मिळाला, असा विश्‍वास जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

चार वर्षे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणाऱ्या तटकरे यांची नुकतेच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. 

राष्ट्रवादी कुठेही सत्तेत नसताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची धुरा सांभाळत संघटना वाढविण्याचे काम केले. त्याच पद्धतीने ते देशपातळीवर चांगली कामगिरी करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करतील. त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिल्यामुळे आनंद आहे. 
-शौकत मुकादम, 

प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग

माजी खासदार (कै.) गोविंदराव निकम यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर देशपातळीवर कोकणातून काम करणाऱ्या नेत्याची उणीव भासत होती. तटकरे साहेबांच्या माध्यमातून ती भरून निघाली आहे. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. राष्ट्रीय राजकारणात ते यशस्वी होतील. कोकणातील संघटनेकडे त्यांचे अधिक लक्ष असेल.
शेखर निकम,
माजी जिल्हाध्यक्ष

Web Title: Ratnagiri News Sunil Tatkare NCP Secretary