बाजारातील वस्तूप्रमाणे माणसे विकत घेण्याची भाजपची भाषा - सुप्रिया सुळे  

सिद्धेश परशेट्ये
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

खेड - महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकता राहिली नाही. भारतीय जनता पक्षाचे सगळेच नेते कमोडिटी पद्धतीने साऱ्याच पक्षांच्या लोकांकडे बघत आहेत. हा महाराष्ट्रातील समस्त जनतेचा अपमान आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला फटकारले. 

आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने खेड येथे त्या आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव आदी उपस्थित होते. 

खासदार सुळे म्हणाल्या की, रत्नागिरीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मुळावर कोण येणार असेल, तर सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा दिलेला इशारा हास्यास्पद आहे. "मी लाभार्थीं'च्या जाहिरातीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे; परंतु कर्जमाफीसाठी नाही. तीन वर्षे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे.

कोकणातील शेतकऱ्यांच्या शेती, बागायतींच्या नुकसानीचे पंचनामे करूनही नुकसानभरपाई मिळत नाही. हा युती शासनाच्या तीन वर्षांच्या काळात अन्याय झाला आहे. आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने कोकणात फिरताना अनेकांची याबाबत निवेदने माझ्याकडे आली. यापुढे राष्ट्रवादी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभी राहील, असेही सुळे म्हणाल्या.

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी राज्यातील खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजवतो, असे सांगितले आहे. खड्डे भरल्यास त्यांचा मी सत्कार करेन, भरले नाहीतर त्यांना शांत बसू देणार नाही. राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात आक्रोश मोर्चांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

Web Title: Ratnagiri News Supriya Sule Press