स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अप्रचलित रचना सादर करून संगीतमय आदरांजली

मकरंद पटवर्धन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - येथे वास्तव्यास असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक गीते रचली होती. भाषाशुद्धीसह सामाजिक समरसतेसाठी अनेक रचना त्यांनी केल्या. या अप्रचलित रचनांसह त्यांच्या गाजलेल्या रचना सादर करून अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने सावरकरांना संगीतमय आदरांजली वाहिली.

रत्नागिरी - येथे वास्तव्यास असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक गीते रचली होती. भाषाशुद्धीसह सामाजिक समरसतेसाठी अनेक रचना त्यांनी केल्या. या अप्रचलित रचनांसह त्यांच्या गाजलेल्या रचना सादर करून अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने सावरकरांना संगीतमय आदरांजली वाहिली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त काल (ता. 25) हा कार्यक्रम रंगला. सदया गणया तार, ऐक भविष्याला, उद्धरिसी गा हिंदू जातीशी देवा, तुम्ही देवाच्या, लक्ष्मी पूजन करू घरोघरी, श्रीमुख चांगले असे पितांबर ही अप्रचलित गीते यावेळी सादर झाली. तसेच मर्मबंधातली ठेव ही, भवाचिया येणे येतो काकुळती, जयदेव जयजय शिवराया, ने मजसि ने परत मातृभूमीला, नीज जाती छळाने, बरसोनी यौवन, सिंहगडाचा तोरणा ही सावरकरांची लोकप्रिय गीतेही सादर झाली.

कार्यक्रमाची संकल्पना दीपक पोंक्षे यांची होती. त्यांनीच  सावरकरांच्या अप्रचलित गीतांना संगीत दिले. या गीतांनी वाहवा मिळवली. या कार्यक्रमात गायिका श्‍वेता जोगळेकर, अजिंक्‍य पोंक्षे, अभिजित भट व वाद्यसाथ चैतन्य पटवर्धन, राजू धाक्रस, उदय गोखले, हरेश केळकर व चिन्मय बेर्डे यांनी केली.  

सावकरांची स्वातंत्र्याची जीवनगाथा, काव्याचा आधार घेत श्रीनिवास पेंडसे यांनी अतिशय प्रभावीपणे मुद्देसूदरित्या मांडली. स्वातंत्र्यसेनानी भगतसिंगाना फाशी दिली गेली त्याच दिवशी  सावरकरांनी लिहिलेले "भगतसिंह हाथ हा' हो गीत अजिंक्‍य पोंक्षे व सहकाऱ्यांनी सुरेख म्हटले. जयोस्तुते श्री महन्मंगले या गीताला रसिकांच्या टाळ्या मिळाल्या.

प्रारंभी मंडळाच्या उपाध्यक्षा स्मिता परांजपे, साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी, गायक प्रसाद गुळवणी, श्रीनिवास पेंडसे यांनी दीपप्रज्वलन केले. दीपक पोंक्षे यांचा सत्कार कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांनी केला. तसेच कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी व सदस्य अविनाश काळे यांनी कलाकारांचे स्वागत केले.

Web Title: Ratnagiri News Swatantraveer Sawarkar death anniversary