भविष्यात थिबा पॅलेसच्या साक्षीने प्रतिष्ठित सोहळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - एखाद्या पॅलेसच्या साक्षीने लग्न किंवा अन्य समारंभ करणे आता प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. बंगळूर पॅलेसला त्यासाठी चांगले नाव आहे. त्या धर्तीवर रत्नागिरीतील थिबा पॅलेसच्या साक्षीने असे समारंभ करणे शक्‍य होणार आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या विचाराधीन ही संकल्पना असून, त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार केला जाणार आहे. थिबा पॅलेस मूळ स्वरूपात जतन करण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू आहे. पॅलेसच्या परिसराचा विकास करून उत्कृष्ट लॉन, पार्किंग, सुशोभीकरण करण्यात येणार आहे. 

रत्नागिरी शहराला लाभलेल्या अनेक ऐतिहासिक वारशांपैकी सर्वांत महत्त्वाचा वारसा म्हणजे थिबा राजवाडा (पॅलेस). नोव्हेंबर १९१० ला वापरात आलेल्या या राजवाड्याची शताब्दी सुरू आहे. रत्नागिरीच्या शतकी वाटचालीचा हा मूक साक्षीदार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. इंग्रजांनी थिबा राजासाठी बांधलेल्या या राजवाड्यामुळे रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले; परंतु या पॅलेसची अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे अनेक प्रस्ताव शासन पातळीवर मंजूर करण्यात आले. गेली चार ते पाच वर्षांमध्ये सुमारे पाच कोटी रुपये दुरुस्तीसाठी आले होते. संबंधित ठेकेदाराकडून सुमार दर्जाचे आणि कासवाच्या गतीने काम सुरू होते. प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालते. त्यांनी थिबा पॅलेसला भेट दिल्यानंतर सुमार दर्जाची कामे त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ठेकेदार आणि आर्किटेक यांना कानपिचक्‍या दिल्या. त्यांच्याकडून दर्जेदार काम करून घेतले. त्यामुळे काही दिवसांत मूळ स्वरूपात थिबा पॅलेसचा थाट दिसणार आहे.  बंगळूर पॅलेसची वेगळी क्रेझ निर्माण झाली आहे. अनेक लग्न समारंभांसह विविध कार्यक्रम या पॅलेसच्या साक्षीने होतात. प्रतिष्ठेची बाब म्हणून याकडे पाहिले जाते. तीच प्रतिष्ठा थिबा पॅलेसला देण्याचा विचार जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांचा आहे. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. परिसर सुशोभीकरणासाठी लॉन टाकणे, पार्किंगची व्यवस्था, जागेचे सौंदर्य वाढवणे आदींचा विचार होणार आहे. त्यामुळे भविष्यात थिबा पॅलेसच्या साक्षीने मोठे समारंभ होण्याची अपेक्षा रत्नागिरीकर बाळगू शकतात.

प्रतिष्ठा म्हणून बंगळूर पॅलेससमोर विविध सोहळ्यांसाठी अनेक कार्यक्रम होतात. बंगळूर पॅलेससारखी ओळख थिबा पॅलेसला मिळावी, यासाठी प्रयत्न आहे.
-प्रदीप पी. जिल्हाधिकारी, रत्नागिरी

Web Title: ratnagiri news Thiba Palace