पर्यटनवाढीसाठी रत्नागिरीत पर्यटन पर्व

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - राज्यात पर्यटनवाढ व विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ५ ते २५ ऑक्‍टोबर या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी पर्यटन पर्व साजरे करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्रालय, नवी दिल्ली आणि पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. या पर्यटन पर्वाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या हस्ते पर्यटन विकास महामंडळ या कार्यालयात करण्यात आले. 

या वेळी पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी अभिनव गोयल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण आणि अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमांतर्गत स्थानिक पातळीवर स्थानिक जिल्हा प्रशासन व प्रादेशिक कार्यालये, मपविम यांच्या संयुक्त विद्यमाने व पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिकांच्या सहकार्याने स्थानिक कला, संस्कृती, पाककृती व पर्यटन स्थळांची ओळख घडविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

विभागातील सर्व पर्यटक निवास, प्रकल्प कार्यालये, गोवा माहिती व आरक्षण कार्यालय येथे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. पर्यटन पर्वाचे माहिती फलक दर्शनी भागात लावणे, स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या भागभांडवलधारकाकडून स्मृतिचिन्हे प्राप्त करून कार्यालयात व पर्यटन निवासातील दर्शनी भागात प्रदर्शित करावे, पर्यटन या विषयावर चित्रकला स्पर्धा, फूड फेस्टिवल, सवलत व लकी ड्रॉ कुपनबाबतची माहिती जास्तीत जास्त प्रमाणात प्रसारित करणे, फोटो स्पर्धा, स्वच्छता अभियान, स्थानिक लोककला यांचे सादरीकरण, स्थानिक भागभांडवलधारकांचे सादरीकरण, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

Web Title: Ratnagiri news Tourism Festival