रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर देवळे घाटात अपघातात तीन ठार

संदेश सप्रे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

देवरुख - कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक व ट्रक चालकही ठार झाल्याची घटना आज संध्याकाळी सहाच्या सुमारास वाजता रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर देवळे घाटात घडली. 

देवरुख - कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनरची (एमएच 08 डब्लु 8771) दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक तसेच कंटेनर चालक असे तीनजण ठार झाल्याची घटना आज संध्याकाळी सहाच्या सुमारास रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर देवळे घाटात घडली. 

चंद्रकांत बाळु रावण ( वय ३०, चाफवली) व सुरेश सिताराम रावण (वय २९, चाफवली) हे दोघे दुचाकीस्वार ठार झाले आहेत. दुचाकीला तीव्र उतारात धडक देत कटेनर बाजुच्या झाडावर आदळला. यामध्ये कंटेनरच्या दर्शनी भागाचा चुराडा झाल्याने चालक आतमधेच अडकुन पडला. त्याला काढण्याचे काम सुरु होते. यात तोही ठार झाल्याचे समजते. त्याचे नाव मात्र समजू शकले नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे.

Web Title: Ratnagiri News Two Dead in an accident